Video : बिहारमध्ये RJD कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, तेजस्वी आणि तेजस्वी यादव पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी बळाचा वापर करत आरजेडी कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्जही केला. यावेळी आरजेडी कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेकही करण्यात आली. यात अनेक पोलीस कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधीही जखमी झाले आहेत.
नवी दिल्ली : बिहारमधील वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आरजेडी कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्जही केला. यावेळी आरजेडी कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेकही करण्यात आली. यात अनेक पोलीस कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधीही जखमी झाले आहेत. वातावरण अधिक गंभीर बनल्यानंतर पोलिसांनी तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांना ताब्यात घेतलं आहे.(Police lathicharges RJD activists in Bihar, Tejaswi Yadav and Tej Pratap Yadav in custody)
बिहारमधील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभेला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी तेजस्वी यादव आणि आरजेडी कार्यकर्ते पाटण्याताली जेपी. गोलंबर इथे जमले. त्यांनी विधानसभेवर कूच करण्याची तयारी केली. पण जिल्हा प्रशासनाकडून त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यानंतर आरजेडी कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. अखेरिस पोलिसांनीही बळाचा वापर केला.
बिहार: राष्ट्रीय जनता दल के नेता तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव और पार्टी कार्यकर्ताओं ने पटना में बेरोज़गारी, शिक्षा, स्वास्थ्य और कानून व्यवस्था को लेकर विरोध प्रदर्शन किया। पुलिस ने प्रदर्शनकारियों पर वाटर कैनन का इस्तेमाल किया। pic.twitter.com/VWYNzDwoDI
— ANI_HindiNews (@AHindinews) March 23, 2021
पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज
आरजेडीच्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. राजधानीमध्ये या आंदोलनादरम्यान वातावरण तणावपूर्ण झालं होतं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. आंदोलक ऐकायला तयार नाहीत हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला.
वाह बिहार पुलिस हमारे निहत्थे कार्यकर्तावो पर पानी और लाठी की बौछार कम थी….
जो अब पत्थर भी चला रहे हो… ये दमन कारी सरकार अब अपने आखरी दिन गिन रही है! #Tejashwi_WithYouth @yadavtejashwi @sanjuydv @OfficialAaKu @RJDforIndia pic.twitter.com/XQO4TgGhU7
— Zishan Ali Laddu (@zishanAliRJD) March 23, 2021
तेज प्रताप यादव यांचं ट्वीट
“वाढती बेरोजगारी, सरकारची क्रूर वृत्तीविरुद्ध आम्ही शांततेत निदर्शनं करत होते. पण आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला, पोलिसांनी दगड फेकले. समस्यांची सोडवणूक करण्यापेक्षा बिहारवासियांवरच अशाप्रकारे अन्याय सुरु झाला आहे”, असं ट्वीट करत तेज प्रताप यादव यांनी नितीश कुमार सरकारवर टीका केलीय.
बढ़ती हुई बेरोज़गारी के विरुद्ध, सत्ता के क्रूर रवैये के विरुद्ध हम शांति प्रदर्शन कर रहे थे लेकिन हमारे कार्यकर्ताओं के साथ दुर्व्यवहार किया गया उनपर लाठियां और पत्थर बरसाई गई।
समस्याओं के निराकरण के बजाए बौखलाहट में अब बिहारवासियों के खिलाफ बर्बरता पर ये सरकार उतारू हो गई है। pic.twitter.com/PhABE7VCrt
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) March 23, 2021
इतर बातम्या :
केवळ महाराष्ट्रच नव्हे, ‘या’ राज्यांनाही 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण हवंय!
Kabaddi in Telangana: तेलंगणाच्या सूर्यापेटमधील कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली, 50 हून अधिक जखमी
Police lathicharges RJD activists in Bihar, Tejaswi Yadav and Tej Pratap Yadav in custody