Vikas Dubey Encounter | गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, STF ची गाडी उलटल्यानंतर पोलिसांशी चकमक
अपघाताचा गैरफायदा घेऊन विकास दुबेने बंदुकीसह पळ काढल्याचा दावा पोलिसांनी केला. यावेळी 15 मिनिटे चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागल्या
कानपूर : कुख्यात गुंड विकास दुबे याचा चकमकीत खात्मा झाला. दुबेला कानपूरला नेताना एसटीएफच्या ताफ्यातील वाहन उलटले. अपघाताचा गैरफायदा घेऊन बंदुकीसह पळ काढणाऱ्या दुबेचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. (Vikas Dubey Dead in Encounter with Uttar Pradesh STF)
उज्जैनहून विकास दुबेला घेऊन उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची टीम (एसटीएफ) कानपूरला निघाली होती. यावेळी एसटीएफच्या ताफ्यात स्कॉर्पिओ, सफारी आणि महिंद्र अशी तीन वाहने होती. यापैकी पहाटेच्या सुमारास महिंद्र Tuv रस्त्यात उलटली. यामध्ये एसटीएफचा पोलीस कर्मचारी जखमी झाला.
अपघाताचा गैरफायदा घेऊन विकास दुबेने बंदुकीसह पळ काढल्याचा दावा पोलिसांनी केला. यावेळी 15 मिनिटे चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागल्या. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता.
Gangster Vikas Dubey dead: Police
— Press Trust of India (@PTI_News) July 10, 2020
उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर विकास दुबे याला काल (9 जुलै) उज्जैन येथून अटक करण्यात आली. यूपी पोलिसांनी त्याची पत्नी आणि मुलालाही लखनौहून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आतापर्यंत विकास दुबे टोळीशी संबंधित पाच गुन्हेगारांना ठार मारले आहे.
One of the vehicles of the convoy of Uttar Pradesh Special Task Force (STF) that was bringing back #VikasDubey from Madhya Pradesh to Kanpur overturns. Police at the spot. More details awaited. pic.twitter.com/7OTruZ2R7h
— ANI UP (@ANINewsUP) July 10, 2020
पोलिसांच्या हत्येनंतर त्यांचे मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचं नियोजन असल्याची कबुली विकास दुबे याने दिली होती. घराच्या समोरच पाच पोलिसांचे मृतदेह एकावर एक रचले होते, मात्र ते जाळता आले नाहीत, असं तो म्हणाला.
कोण होता विकास दुबे?
विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात जवळपास 60 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका हत्या प्रकरणात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस कानपूरमध्ये गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या पथकावर त्याच्या गुंडांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस शहीद झाले, तर सात पोलीस जखमी झाले.
हेही वाचा : हत्येनंतर जाळण्यासाठी घराच्या समोरच 5 पोलिसांचे मृतदेह रचले, चौकशीत गँगस्टर दुबेची कबुली
कानपूरच्या चौबैपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरु गावात हा प्रकार घडला. दुबेच्या घराला तटबंदी असून पोलिसांची कोंडी करुन त्यांच्यावर दुबेच्या गुंडांनी हल्ला केला.
विकास दुबे हा अनेक राजकीय पक्षांशी संबंधित होता. त्यामुळे तो आजपर्यंत पकडला गेला नाही. विकास दुबे याने 2001 मध्ये पोलीस ठाण्यात घुसून भाजप नेते आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. संतोष शुक्ला हत्या प्रकरणामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली होती. (Vikas Dubey Dead in Encounter with Uttar Pradesh STF)