विमान हवेत असताना अचानक करावी लागली हार्ट सर्जरी, 5 डॉक्टर 2 वर्षाच्या मुलीसाठी बनले देवदूत

बंगळुरुहून या विमानाने उड्डाण केलं होतं. अचानक हे विमान नागपूरला वळवण्यात आलं. इमर्जन्सी कॉलची घोषणा होताच, फ्लाइटमधील एम्सचे पाच डॉक्टर मुलीसाठी देवदूत बनले.

विमान हवेत असताना अचानक करावी लागली हार्ट सर्जरी, 5 डॉक्टर 2 वर्षाच्या मुलीसाठी बनले देवदूत
Vistara Airlines
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 1:25 PM

नवी दिल्ली : बंगळुरुहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात रविवारी संध्याकाळी चमत्कार झाला. 2 वर्षाच्या मुलीची अचानक तब्येत बिघडली. त्याचवेळी विमानात असलेल्या 5 डॉक्टर्सनी मुलीवर उपचार केले. एम्सच्या डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने मुलीचे प्राण वाचले. रविवारी संध्याकाळी बंगळुरुहून विस्ताराच्या यूके-814 फ्लाइटने दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केलं. विमान हवेत असताना, इमर्जन्सी कॉलची घोषणा करण्यात आली. 2 वर्षांची ही मुलगी सियानोटिक आजाराने ग्रस्त होती. ती बेशुद्ध झाली होती.

विमानातच मुलीची तब्येत बिघडली. तिच्या नाडीचे ठोके मिळत नव्हते. हात-पाय थंड पडले होते. इमर्जन्सी कॉलची घोषणा होताच, फ्लाइटमधील एम्सचे डॉक्टर मदतीसाठी पुढे आले.

इमर्जन्सी प्रोसेस स्टार्ट

विमानातील उपस्थित डॉक्टर्सनी लगेच मुलीवर सीपीआर उपचार सुरु केले. त्यांच्याकडे जी साधनी होती. त्यानेच उपचार सुरु केले. फ्लाइटमध्ये IV दिलं. डॉक्टर्सनी इमर्जन्सी प्रोसेस स्टार्ट केली. उपचार सुरु असतानाच, कार्डिएक अरेस्टचा झटका आला. त्यानंतर AED उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी 45 मिनिट मुलीवर उपचार केले. त्यांच्याकडे जी साधन होती, त्याद्वारे त्यांनी मुलीचे प्राण वाचवले. 45 मिनिटाच्या उपचारानंतर विमान नागपूरला नेण्यात आलं. तिथे चाइल्ड स्पेशलिस्टकडे मुलीला सोपवण्यात आलं. आता त्या मुलीच्या प्रकृतीला धोका नाहीय.

त्या डॉक्टरांची नाव काय?

डॉ. नवदीप कौर, एसआर कार्डियक रेडियोलॉजी डॉ. दमनदीप सिंह, माजी एसआर एम्स रेडियोलॉजी डॉ. ऋषभ जैन, माजी एसआर एम्स एसआर ओबीजी डॉ. ओइशिका आणि एसआर कार्डियक रेडियोलॉजी डॉ. अविचला टेक्सक या एम्सच्या डॉक्टरांनी मुलीवर उपचार केले . सियानोटिक हा काय आजार आहे?

2 वर्षाच्या मुलीला सियानोटिक हा जन्मजात आजार आहे. यात हार्टच्या आर्टरीज आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. यामध्ये त्वचा निळी पडते. अचानक श्वासोश्वास करताना त्रास होतो. वेळीच उपचार मिळाले नाहीत, तर मृत्यू होऊ शकतो. याला कॉन्जेनिटल हार्ट डिजीज सुद्धा म्हटलं जातं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.