Rahul Gandhi: मी सत्तेच्या वर्तुळात वाढलो, पण मला सत्तेत स्वारस्य नाही: राहुल गांधी
Rahul Gandhi: देशाने माझ्यावर केवळ प्रेमच केलं नाही तर मला मारहाणही केली आहे. हे का होत आहे? असा विचार मी करतोय. देश मला काही तरी शिकवतोय हेच यातून मला उत्तर मिळालं आहे. तू शिक आणि समजून घे असं मला देश म्हणतोय.
लखनऊ: देशाने माझ्यावर केवळ प्रेमच केलं नाही तर मला मारहाणही केली आहे. हे का होत आहे? असा विचार मी करतोय. देश मला काही तरी शिकवतोय हेच यातून मला उत्तर मिळालं आहे. तू शिक आणि समजून घे असं मला देश म्हणतोय, असं सांगतानाच अनेक राजकारणी (politician) सत्तेच्या शोधात असतात. ते सातत्याने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. सत्तेचा विचार करत असतात. मी सत्तेच्या वर्तुळात वाढलो. पण प्रामाणिकपणे सांगतो मला सत्तेत जराही स्वारस्य नाही. त्याऐवजी मी देश समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी सांगितलं. माजी सनदी अधिकारी आणि काँग्रेसचे नेते के. राजू (k. raju) यांच्या ‘द दलित युथ: द बॅटल्स फॉर रिअलायझिंग आंबेडकर्स’ या पुस्तकाचे राहुल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी यावेळी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावरही टीका केली. निवडणुकीपूर्वी आम्ही मायावती यांना आघाडी करण्यासाठी मसेज केला होता. पण त्यांनी मेसेजचा रिप्लाय दिला नाही. लोकांनी घाम गाळून उत्तर प्रदेशात दलितांच्या वेदनेला वाचा फोडली, पण मायावती यांनी या लोकांसाठी लढण्यास नकार दिला, असं राहुल गांधी म्हणाले. ईडी आणि सीबीआयच्या भीतीने मायावतीने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतल्याचं राहुल यांचं म्हणणं आहे. या कारणामुळेच कोणत्याही पूर्व तयारीशिवाय मायावती उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरल्या, असा दावाही त्यांनी केला.
सचिन पायलट आणि राहुल गांधी भेट
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मंथन सुरू होतं. त्यावेळी राहुल गांधी यांनी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची भेट घेतली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात पायलट अधिक सक्रिय होऊ शकतात असं सांगितलं जातं. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राजस्थानशी संबंधित मुद्दे, काँग्रेसची सदस्यत्वाची मोहीम आणि पक्ष मजबूत करण्यावर चर्चा झाली. दरम्यान, या पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्याबाबतचे संकेतही काँग्रसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहेत.
#WATCH There’re politicians who’re in pursuit of power. They ponder upon attaining power throughout…I was born in centre of power but honestly, I don’t have interest in it. Instead, I try to understand the country: Congress MP Rahul Gandhi at a book-launch event in Delhi pic.twitter.com/DH1rltlYzE
— ANI (@ANI) April 9, 2022
संबंधित बातम्या:
Rahul Gandhi: श्रीलंकेसारखं भारतातही सत्य बाहेर येईल; राहुल गांधी यांचा दावा
UP : महिलांवरती बलात्कार करण्याची उघडपणे धमकी, व्हिडीओच्या आधारे महंतांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Breaking News: कर्नाटकातल्या विविध शाळांना एकाच वेळेस धमकीचा मेल, बंगळुरुत ‘बाँब’ची कसून तपासणी