Weather Today: दिल्ली-एनसीआर ते यूपी-बिहारपर्यंत थंडीची लाट, या राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा
या राज्यामध्ये आज पावसाची शक्यता
मुंबई : अनेक ठिकाणी होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे (due to snowfall) थंडीची लाट (A cold snap) सर्वत्र पसरली आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश (UP) या राज्यांना थंडीच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. बिहार-झारखंड या राज्यांमध्ये सध्या थंडीचा जोर अधिक वाढला आहे. येत्या काही दिवसात थंडीचा जोर अधिक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आज तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशसह दक्षिण भारतातील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून 21 डिसेंबरपर्यंत अनेक राज्यात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यात तापमान कमी होण्याचं असल्याचे सुद्धा हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
पुढच्या दोन दिवसात देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येणार आहे. त्यामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तरी राजस्थान या राज्यांमध्ये अधिक थंडी असेल. विशेष म्हणजे तापमान कमी होणार असल्यामुळे थंडीची तीव्रता अधिक वाढणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यातं आलं आहे.