AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांचीही पहिली यादी जाहीर

काँग्रेसनं 13 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यातील 5 उमेदवार हे पहिल्या टप्प्यातील तर अन्य 8 उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील आहेत.

West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांचीही पहिली यादी जाहीर
Congress flag
| Updated on: Mar 07, 2021 | 12:03 AM
Share

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस, भाजपनंतर आता काँग्रेसनंही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शनिवारी काँग्रेसनं 13 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यातील 5 उमेदवार हे पहिल्या टप्प्यातील तर अन्य 8 उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील आहेत. भाजपनेही आपल्या 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपने सुवेंदु अधिकारी यांना रिंगणात उतरवलं आहे.(Congress announces list of 13 candidates for West Bengal Assembly elections)

काँग्रेसकडून मोयनामधून माणिक भौमिक यांना तिकीट देण्यात आलं आहे. या ठिकाणी भाजपकडून माजी क्रिकेटर अशोक दिंडाला रिंगणात उतरवण्यात आलं आहे. बाघमुंडीतून काँग्रेसनं नेपाल महतो यांनी तिकीट दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपकडून आजसू यांना तिकीट देण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि वाम मोर्चाने आघाडी केली आहे.

काँग्रेसची पहिली यादी

पाथारप्रतिमा – सुखदेब बेरा (दुसरा टप्पा) काकद्विप – इंद्रनिल राऊत (दुसरा टप्पा) मोयना – माणिक भौमिक (दुसरा टप्पा) भागबानपूर – शिऊ मैती (पहिला टप्पा) इगरा – मानस कुमार करम्हापात्रा (पहिला टप्पा) खरगपूर सरदार – समिर रॉय (दुसरा टप्पा) साबांग – चिरंजिब भौमिक (दुसरा टप्पा) बालारामपूर – उत्तम बॅनर्जी (पहिला टप्पा) भागमुंडी – नेपाल महतो (पहिला टप्पा) पुरुलिया – पार्था प्रतिम बॅनर्जी (पहिला टप्पा) बांकुरा – राधा राणी बॅनर्जी (दुसरा टप्पा) बिष्णुपूर – देबू चॅटर्जी (दुसरा टप्पा) कातुलपूर(sc) – अक्षय सांत्रा (दुसरा टप्पा)

भाजपच्या 57 उमेदवारांची यादी जाहीर

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 294 पैकी 291 उमेदवार जाहीर केले. त्यानंतर आता भाजपने आपल्या 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात  तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले सुवेंदु अधिकारी मैदानात उतरणार आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने 57 जणांच्या पहिल्या उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती भाजपचे सचिव अरुण सिंग यांनी दिली.

संबंधित बातम्या : 

BJP Candidate List West Bengal Election 2021 : भाजपचे 57 उमेदवार ठरले, नंदीग्राममध्ये देशातील सर्वात मोठी लढत

ममता बॅनर्जींना सत्तेत आणणाऱ्या नंदिग्रामची कहाणी, पुन्हा नंदिग्राम का गाजतंय?

Congress announces list of 13 candidates for West Bengal Assembly elections

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.