West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकीतही काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी! ISF सोबत आघाडी केल्यानं काँग्रेसचे दिग्गज नेते नाराज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी या आघाडीवर सवाल उपस्थित करताना पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना प्रश्न विचारला आहे.

West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकीतही काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी! ISF सोबत आघाडी केल्यानं काँग्रेसचे दिग्गज नेते नाराज
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 8:49 PM

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF)सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन आता काँग्रेसमध्येच मतमतांतरे निर्माण होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी या आघाडीवर सवाल उपस्थित करताना पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना प्रश्न विचारला आहे. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वामदल, काँग्रेस आणि आयएसएफने आघाडी केली आहे. मात्र, पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील ISF आणि काँग्रेसमध्ये फार काही सख्य नाही.(Congress leader Anand Sharma opposes Congress alliance with ISF)

“ISF आणि अशा दुसऱ्या पक्षांशी आघाडी ही काँग्रेसच्या विचारधारांच्या विरोधात आहे. जो गांधी आणि नेहरु यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांतावर आधारीत आहे. या मुद्द्यावर काँग्रेस कार्य समितीत चर्चा झाली पाहिजे”, असं ट्वीट आनंद शर्मा यांनी केलं आहे. ‘जातीयवादाविरोधात लढाई लढताना काँग्रेस निवडक भूमिका घेऊ शकत नाही. या आघाडीला पाठिंबा देणं वेदनादायी आणि लज्जास्पद आहे. बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं’, असंही आनंद शर्मा म्हणाले.

ममता बॅनर्जींचा काँग्रेसवर हल्लाबोल

तृणमूल काँग्रेसनं सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस आणि कम्यूनिस्ट पक्षावरही जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविवारी मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं (CPM)अनेक पक्षांसोबत आघाडी केली. त्यावर तृणमूल काँग्रेसनं आता काँग्रेस आणि CPM हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष राहिले नसल्याची टीका केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांच्यावरही हल्ला चढवला.

तृणमूल काँग्रेसकडून भाजपवर धार्मिक वातावरण बिघडवण्याला आरोप सातत्याने केला जातो. मात्र सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत TMCने काँग्रेस आणि CPM वरही धार्मिक राजकारण केल्याचा आरोप केला आहे. या पक्षांचं खरं रुप आता सर्वांसमोर आल्याचा आरोप TMCकडून करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

निवडणूक आयोगाने मोदी शाहांच्या सोयीनुसार टीएमसीचे बालेकिल्ले विभागले का? : ममता बॅनर्जी

बिहारच्या ‘तीळकूटा’चे बंगाली मिठाईशी गूळपीठ? ममता बॅनर्जी-तेजस्वी यादव भेट होणार

Anand Sharma opposes Congress alliance with ISF

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.