West Bengal Election 2021 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाची नवी नियमावली, रोड शो, बाईक रॅलीवर बंदी
नव्या नियमावलीनुसार निवडणूक आयोगाने रोड शो, सायकल आणि बाईक रॅलींवर निर्बंध आणले आहेत.
कोलकाता : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या उर्वरित दोन टप्प्यांसाठी नवी नियमावली (West Bengal Election New Guidelines) जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार निवडणूक आयोगाने रोड शो, सायकल आणि बाईक रॅलींवर निर्बंध आणले आहेत. पश्चिम बंगालमध्ये आता रोड शो आणि पद यात्रांवर बंदी लादली आहे. त्याचबरोबर कुठल्याही जाहीर सभा, रॅलींसाठी 500 लोकांची मर्यादा घालून देण्यात आलीय. तसंच जाहीर सभांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना नियमांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (New rules for West Bengal Assembly elections from the Election Commission)
नवी नियमावली जारी करण्यापूर्वी ज्या सायकल किंवा बाईक रॅलींना परवानगी देण्यात आली होती, ती परवानगीही मागे घेतल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसंच यापूर्वी ज्या जाहीर सभांना परवानगी देण्यात आली आहे, त्यांनाही नवे नियम लागू असणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासांत 11 हजार 948 नवे कोरोना रुग्ण आढळून आहे आहे. तर 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
Permission for roadshow, cycle/bike/vehicle rallies, if granted already, stands withdrawn: Election Commission of India
ECI also notes “with anguish” that many political parties/candidates are not adhering to prescribed safety norms during public gatherings #WestBengalPolls pic.twitter.com/2tS9XFzGH5
— ANI (@ANI) April 22, 2021
कोलकाता इथं सर्वाधिक रुग्ण
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं सर्वाधिकर 2 हजार 646, उत्तर 24 परगना इथं 2 हजार 372, हावडा इथं 679, हुगलीमध्ये 578, बीरभूममध्ये 624, पश्चिम वर्धमानमध्ये 596, पूर्व वर्धमानमध्ये 372, मालदामध्ये 467 तर मुर्शिदाबादमध्ये 459 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी निवडणूक आयोगाची फुल बेंचसह बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. पश्चिम बंगालमध्ये अजून 2 टप्प्यातील मतदान बाकी आहे. अशावेळी निवडणूक आयोग मतदानाबाबतही महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
पंतप्रधानांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्याचा पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला आहे. देशातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत उच्चस्तरीय बैठका उद्या बोलावल्या आहेत. पश्चिम बंगालला ऊद्या जाणार नसल्याचं नरेंद्र मोदींनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे. तर काँग्रेसकडून नरेंद्र मोदींना राहुल गांधीच्या पश्चिम बंगालमध्ये सभा न घेण्याचं जाहीर केलं होतं. त्या पावलावर पाऊल टाकल्याबद्दल धन्यवाद, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
Tomorrow, will be chairing high-level meetings to review the prevailing COVID-19 situation. Due to that, I would not be going to West Bengal.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2021
संबंधित बातम्या :
‘अदर पुनावाला ‘डाकू’, सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्या’, भाजप आमदाराने तारे तोडले
New rules for West Bengal Assembly elections from the Election Commission