West Bengal Election 2021 : लालूंचा आदेश, भाजपला रोखण्यासाठी तेजस्वी यादव पश्चिम बंगालच्या मैदानात!
तेजस्वी यादव यांनी आज तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यावेळी लालूंच्या आदेशानंच आपण पश्चिम बंगालमध्ये आलो आहोत, असं तेजस्वी यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांना धक्का देणारे आणि भाजपलाही सळो की पळो करुन सोडणारे तेजस्वी यादव आता पश्चिम बंगालच्या मैदानात उतरले आहेत. तेजस्वी यादव यांनी आज तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यावेळी लालूंच्या आदेशानंच आपण पश्चिम बंगालमध्ये आलो आहोत, असं तेजस्वी यांनी सांगितलं.(RJD leader Tejaswi Yadav meet Mamata Banerjee)
तेजस्वी यादव आणि ममता बॅनर्जी यांची आज भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ राज्याच्या राजकारणावर विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना तेजस्वी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “ममता बॅनर्जी यांना पूर्ण पाठिंबा देण्याचा लालू यादव यांचा निर्णय आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येण्यापासून भाजपला रोखणं हे आमचं पहिलं लक्ष्य आहे”, असं तेजस्वी यादव म्हणाले.
Kolkata: RJD leader Tejashwi Yadav met West Bengal CM and TMC leader Mamata Banerjee today
It is Lalu Ji’s decision to provide full support to Mamata Ji. Our first priority is to stop BJP from coming to power in Bengal, said Yadav pic.twitter.com/c2pyKV3HUX
— ANI (@ANI) March 1, 2021
‘धैर्याला आधार ही सर्वात मोठी गोष्ट’
तर ममता बॅनर्जी यांनीही तेजस्वी यादव यांच्या पाठिंब्याच्या स्वीकार करत, “सर्वात मोठी गोष्ट म्हणजे धैर्याला आधार देणं. तेजस्वी भाई लढत आहेत, म्हणून आम्ही लढत आहोत आणि तसंच त्यांचंही आहे”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.
The biggest thing is support to courage, Tejashwi bhai is fighting, so we are fighting and vice versa: West Bengal Chief Minister Mamata Banerjee pic.twitter.com/IzL3EoCfTH
— ANI (@ANI) March 1, 2021
तृणमूल काँग्रेसची जुळवाजुळव सुरु
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तृणमूल काँग्रेस उमेदवारांची अंतिम यादी तयार करणार आहे. ममता बॅनर्जी यांचा शब्द अखेरचा असेल. अभिषेक बॅनर्जी यांच्यासह युवा नेत्यांचा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली तृणमूल काँग्रेसची नवीन निवडणूक समिती कोलकाता येथील कालीघाट निवासस्थानी भेट घेणार आहे. समितीत तृणमूल युवा संघटनेचे प्रमुख अभिषेक बॅनर्जी यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. समितीत फरहाद हकीम, सुब्रत बक्षी, सौगता रॉय, डेरेक ओ’ब्रायन, अरुप बिस्वास, चंद्रिमा भट्टाचार्य, सीएम जतुआ, सुब्रत मुखर्जी, सुदीप बंडोपाध्याय आणि पार्थ चटर्जी अशा वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
बिहारमध्ये तेजस्वी यादवांची जादू
मागील वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी एकट्याच्या बळावर राष्ट्रीय जनता दलाच्या 70 जागा निवडून आणल्या. काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे राजदला सत्तेपासून दूर राहावं लागलं. तेजस्वी यादव यांच्या झंझावातापुढे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जदयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. पण भाजप एक नंबरचा पक्ष ठरल्यामुळे आणि भाजपने दिलेलं आश्वासन पाळल्यामुळे नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले.
दरम्यान, पश्चिम बंगाल म्हणजे बिहार नाही. तिथे ममता बॅनर्जी यांची गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता राखली आहे. मात्र, यंदा पश्चिम बंगालमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. अशावेळी तेजस्वी यादव यांची पश्चिम बंगालमध्ये काय जादू चालणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
बिहारच्या ‘तीळकूटा’चे बंगाली मिठाईशी गूळपीठ? ममता बॅनर्जी-तेजस्वी यादव भेट होणार
बिहार निवडणुकीपूर्वी चिठ्ठी, बंगाल निवडणुकीआधी बैठक; काँग्रेसच्या ‘त्या’ नेत्यांचं चाललंय काय?
RJD leader Tejaswi Yadav meet Mamata Banerjee