Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election 2021 : तेजस्वी यादवांनंतर आता अखिलेश यादवांचंही ममता बॅनर्जींना समर्थन, भाजपला रोखणं शक्य होणार?

समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांना समर्थन जाहीर केलं आहे.

West Bengal Election 2021 : तेजस्वी यादवांनंतर आता अखिलेश यादवांचंही ममता बॅनर्जींना समर्थन, भाजपला रोखणं शक्य होणार?
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 3:24 PM

लखनऊ : पश्चिम बंगालमध्ये आता विधानसभेचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांनी आक्रमक प्रचार सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेत्यांनी पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अशावेळी आता समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांना समर्थन जाहीर केलं आहे.(Akhilesh Yadav also supports Mamata Banerjee)

रायझिंग यूपी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलताना अखिलेश यादव यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना समर्थन जाहीर केलं आहे. अखिलेश यादव म्हणाले की, त्यांचा पक्ष पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना समर्थन देत आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमय नंदा आणि पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतील, अशी घोषणाही अखिलेश यादव यांनी केली आहे.

‘प. बंगालमधील TMCचा विजय हा समाजवादी पक्षाचाही विजय’

काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणं झालं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय हा समाजवादी पक्षाचा विजय असेल. पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजप आणि त्यांचे काही सहकारी पक्ष लपून आहेत. निवडणूक संपताच भाजपचे लपून बसलेले सहकारी पक्ष उत्तर प्रदेशात येतील. मात्र, आता उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवण्यास तयार आहे, असा टोलाही अखिलेश यांनी यावेळी लगावला आहे.

तेजस्वी यादवही पश्चिम बंगालच्या मैदानात

बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांना धक्का देणारे आणि भाजपलाही सळो की पळो करुन सोडणारे तेजस्वी यादव आता पश्चिम बंगालच्या मैदानात उतरले आहेत. 1 मार्च रोजी तेजस्वी यादव यांनी आज तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यावेळी लालूंच्या आदेशानंच आपण पश्चिम बंगालमध्ये आलो आहोत, असं तेजस्वी यांनी सांगितलं.

तेजस्वी यादव आणि ममता बॅनर्जी यांची आज भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ राज्याच्या राजकारणावर विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना तेजस्वी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “ममता बॅनर्जी यांना पूर्ण पाठिंबा देण्याचा लालू यादव यांचा निर्णय आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येण्यापासून भाजपला रोखणं हे आमचं पहिलं लक्ष्य आहे”, असं तेजस्वी यादव म्हणाले.

संबंधित बातम्या :

West Bengal Election 2021 : लालूंचा आदेश, भाजपला रोखण्यासाठी तेजस्वी यादव पश्चिम बंगालच्या मैदानात!

West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकीतही काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी! ISF सोबत आघाडी केल्यानं काँग्रेसचे दिग्गज नेते नाराज

Akhilesh Yadav also supports Mamata Banerjee

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.