West Bengal Election : ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा घेणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सौरव गांगुलीलाही निमंत्रण
ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. तसंच 6 मे रोजी विधानसभेचे प्रोटेम अध्यक्ष बिमान बॅनर्जी हे सर्व पक्षाच्या आमदारांना शपथ देतील. त्याचबरोबर बिमान बॅनर्जी यांचीच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे. (Mamata Banerjee will be sworn in as the Chief Minister of West Bengal)
सौरव गांगुलीसह अनेक नेते उपस्थित राहणार
ममता बॅनर्जी यांचा शपथविधी सोहळा उद्या सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी राजभवनमधील टाऊन हॉलमध्ये होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. त्याचबरोबर क्रिकेटर सौरव गांगुली, माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, वाम मोर्चाचे विमान बोस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषही या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.
6 महिन्यात ममतांना आमदार बनावं लागणार
यंदाच्या निवडणुकीत भाजपचं तगडं आव्हान मोडून काढत ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. इतकंच नाही तर त्यांनी 2016 पेक्षा चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. असं असलं तरी स्वत: ममता बॅनर्जी यांना मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पुढील सहा महिन्यात आमदार बनणं गरजेचं आहे.
सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी या सगल तिसऱ्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. पहिल्यांदा 2011 मध्ये त्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी 34 वर्षे सत्ते असलेल्या डाव्यांना खुर्चीवरुन खाली खेचलं होतं. त्यावेळी ममता यांचा टाईम्सच्या जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश झाला होता. त्यानंतर 2016 मध्ये दुसऱ्यांना ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या.
ममता बॅनर्जींना एकहाती बहुमत
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं 292 पैकी तब्बल 213 जागांवर विजय संपादित करत एकहाती बहुमत मिळवलं आहे. 205 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला मात्र 77 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज नवनियुक्त आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीत सर्वांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर कोरोना नियमाबाबत लोकांचमध्ये जागृती निर्माण करणे आणि स्थानिकांची मदत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मोठी बातमी! कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघात 30 वर्षांनंतर सत्तांतर, सतेज पाटलांचा महाडिकांना धोबीपछाड#DhananjayMahadik #gokuldudhsanghelection #Gokulelection2021https://t.co/th27WUB8rl
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2021
संबंधित बातम्या :
Mamata Banerjee will be sworn in as the Chief Minister of West Bengal