बिहारच्या ‘तीळकूटा’चे बंगाली मिठाईशी गूळपीठ? ममता बॅनर्जी-तेजस्वी यादव भेट होणार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल आणि राजदमध्ये हातमिळवणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Mamata Banerjee Tejashwi Yadav)

बिहारच्या 'तीळकूटा'चे बंगाली मिठाईशी गूळपीठ? ममता बॅनर्जी-तेजस्वी यादव भेट होणार
ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 1:52 PM

कोलकाता : बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे युवा नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) पश्चिम बंगालमध्येही धुरळा उडवणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे लालूपुत्र तेजस्वी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे बिहारचे ‘तीळकूट’ आणि बंगालची मिठाई अशा दोन मिष्टान्नांची एकी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. (West Bengal Vidhansabha Election Trinamool Congress Chief Mamata Banerjee to meet RJD Leader Tejashwi Yadav)

युती की मैत्रीपूर्ण लढत

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल आणि राजदमध्ये हातमिळवणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच थेट युती-आघाडीऐवजी दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्हं आहेत. गेल्याच महिन्यात अब्दुल बारी सिद्दीकी, श्याम रजक यांच्यासारख्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात राजदच्या शिष्टमंडळाने अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतली होती. अभिषेक बॅनर्जी तृणमूलसाठी निवडणूक रणनीती आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

आसनसोलमध्ये यादव मतदार

तेजस्वी यादव यांच्या राजदने यादव मतांमध्ये चांगलाच प्रभाव पाडला आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोलसारख्या भागात त्यांचा महत्त्वपूर्ण परिणाम दिसला आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पक्षविस्तार करण्याचा तेजस्वी यादव यांचा मानस आहे.

तृणमूल काँग्रेसची जुळवाजुळव सुरु

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तृणमूल काँग्रेस उमेदवारांची अंतिम यादी तयार करणार आहे. ममता बॅनर्जी यांचा शब्द अखेरचा असेल. अभिषेक बॅनर्जी यांच्यासह युवा नेत्यांचा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली तृणमूल काँग्रेसची नवीन निवडणूक समिती कोलकाता येथील कालीघाट निवासस्थानी भेट घेणार आहे. समितीत तृणमूल युवा संघटनेचे प्रमुख अभिषेक बॅनर्जी यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. समितीत फरहाद हकीम, सुब्रत बक्षी, सौगता रॉय, डेरेक ओ’ब्रायन, अरुप बिस्वास, चंद्रिमा भट्टाचार्य, सीएम जतुआ, सुब्रत मुखर्जी, सुदीप बंडोपाध्याय आणि पार्थ चटर्जी अशा वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. Mamata Banerjee Tejashwi Yadav

तेजस्वी यादव कोण आहेत? (Who is Tejashwi Yadav)

बिहारचे राजकारण कोळून प्यायलेल्या नितीशकुमार यांच्याशी कडवी झुंज दिल्याने राजद नेते तेजस्वी यादव राष्ट्रीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. तेजस्वी यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे चिरंजीव आहेत.

फक्त इयत्ता आठवीपर्यंत शिकलेले तेजस्वी यादव हे मूळचे क्रिकेटपटू आहेत. झारखंडमधून ते रणजी करंडकासाठी खेळले आहेत. शिवाय आयपीएलमध्ये ते दिल्ली डेअरडेविल्सकडून ते खेळले आहेत.

संबंधित बातम्या :

साहेबांच्या अनुभवाच्या पेटाऱ्यातून ज्ञानमोती वेचले, पवारांच्या भेटीनंतर तेजस्वी यादव हरखले

(West Bengal Vidhansabha Election Trinamool Congress Chief Mamata Banerjee to meet RJD Leader Tejashwi Yadav)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.