TV9 नेटवर्कच्या WITT महामंचावर PM मोदींची खास उपस्थिती, सादर करणार विकसित भारताचा रोडमॅप
येत्या 28 आणि 29 मार्च रोजी दिल्लीतील प्रतिष्ठित भारत मंडपम इथं 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. 'टीव्ही 9'च्या या महामंचावर केवळ राजकारणच नाही मनोरंजन, व्यवसाय, आरोग्य, संस्कृती आणि क्रीडा यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन केलं जाईल.

देशातील सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क TV9 पुन्हा एकदा ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (What India Thinks Today Global Summit 2025) या वार्षिक कार्यक्रमाचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाला आहे. टीव्ही 9 च्या या भव्य व्यासपीठावर जगभरातील प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या भव्य व्यासपीठाचे सर्वांत खास पाहुणे असतील. पंतप्रधान मोदी हे गेल्या वेळीसुद्धा टीव्ही 9 च्या या महामंचावर उपस्थित होते. त्यांच्या भाषणात त्यांनी टीव्ही 9 च्या रिपोर्टिंग टीमचं कौतुक केलं होतं.
‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ हा कार्यक्रम 28 आणि 29 मार्च रोजी दिल्ल्लीतल्या प्रतिष्ठित भारत मंडपम इथं आयोजित केला जातोय. टीव्ही 9 च्या या महामंचाद्वारे केवळ राजकारणच नाही तर मनोरंजन, व्यवसाय, आरोग्य, संस्कृती आणि क्रीडा यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन केलं जाईल. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त अनेक केंद्रीय मंत्री तसंच पाच राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील या कार्यक्रमात सहभागी होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षीही होते उपस्थित
या महामंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची प्रगती, 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न आणि जागतिक स्तरावर भारताची भूमिका यांसह अनेक विषयांवर आपले विचार व्यक्त करू शकतात. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी हे टीव्ही 9 नेटवर्कच्या दोन मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले.




पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे 2024’ या वार्षिक परिषदेलाही उपस्थित होते. गेल्या वर्षी 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी ‘द अशोक’ हॉटेलमध्ये पार पडलेल्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’च्या ‘न्यूज 9 ग्लोबल समिट 2024’ला पंतप्रधान उपस्थित होते. त्यानंतर मोदी नोव्हेंबर 2024 मध्ये जर्मनीत झालेल्या न्यूज 9 ग्लोबल समिटमध्येही सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदींकडून टीव्ही 9 टीमचं कौतुक
विचारांच्या या महामंचावर 2024 मध्ये मोदींनी टीव्ही 9 चं खूप कौतुक केलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते, “टीव्ही 9 ची रिपोर्टींग टीम देशाच्या विविधतेचं प्रतिनिधित्व करतं. त्यांच्या बहुभाषिक न्यूज प्लॅटफॉर्म्सने टीव्ही 9 ला भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचं प्रतिनिधी बनवलं आहे.” गेल्या वर्षी हे भव्य व्यासपीठ 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलं होतं.
आपल्या भाषणात सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “आमचं सरकार राष्ट्र प्रथम या तत्त्वाला सर्वांहून वर ठेवून सतत पुढे जात आहे.” पंतप्रधानांनी कलम 370 रद्द करणं, राम मंदिराचं बांधकाम, तिहेरी तलाक रद्द करणं, वन रँक वन पेन्शन, नारी शक्ती वंदन कायदा आणि संरक्षण प्रमुखपदाची निर्मिती यांचाही उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोन अबॉट आणि दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल यांच्यासह भारत आणि परदेशातील अनेक प्रभावशाली व्यक्तींनी ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’च्या न्यूज 9 ग्लोबल समिट 2024 मध्ये भाग घेतला होता.