TV9 नेवटर्कचा WITT महामंच सजला; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या दिग्गज व्यक्ती वाढवणार शोभा
WITT Global Summit 2025 : 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT) 2025' मंच दिल्लीत सजला आहे. भारत मंडपममध्ये दोन दिवस विचारांची शिदोरी अनेकांची भूक भागवेल. 28 आणि 29 मार्च रोजी हे समिटचे आयोजन करण्यात आले आहे. टीव्ही 9 नेटवर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 11 केंद्रीय मंत्री आणि 5 मुख्यमंत्री या मंचाची शोभा वाढवतील.

देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही 9 पुन्हा एकदा व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today Global Summit 2025) हे तिसऱ्यांदा सज्ज झाले आहे. देशाची राजधानी दिल्लीत विविध विषयावर मंथन आणि सखोल चिंतन होईल. भारत मंडपममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश-परदेशातील अनेक ख्यातनाम आणि दिग्गज व्यक्ती हजेरी लावतील. 28 आणि 29 मार्च रोजी हे समिटचे आयोजन करण्यात आले आहे. टीव्ही 9 नेटवर्कमध्ये 11 केंद्रीय मंत्री आणि 5 मुख्यमंत्री या मंचाची शोभा वाढवतील. तर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हे पण सहभागी होतील.
भारत मंडपममध्ये WITT मध्ये वैचारिक शिदोरी
भारत मंडपमच्या ऑडोटोरियम 1 मध्ये राष्ट्रीय धोरणावर मंथन होईल. न्यूज नाईन ग्लोबल समिट बिझनेस अँड इकोनॉमी या विषयावर चर्चा होईल. या धोरणातंर्गत मध्यान्ह जेवणापूर्वी पाच सत्र तर जेवणानंतर 8 सत्र होतील. न्यूज नाईन ग्लोबल समिट बिजनेस अँड इकोनॉमी मंचावर 10 सत्रात दिग्गज त्यांचे विचार मांडतील.




या विचारमंचावर 11 केंद्रीय मंत्री आणि 5 CM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्हॉट इंडिया थिंक्स टुडे 2025 अंतर्गत 11 केंद्रीय मंत्री सहभागी होतील. यामध्ये संरक्षण मंत्री मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा समावेश असेल. पंतप्रधानांनी गेल्या ग्लोबल समिटमध्ये सुद्धा हजेरी लावली होती. त्यांच्या विचाराने देशाची विविध क्षेत्रातील भरारी आणि भविष्यातील भारताचे चित्र उभे ठाकले होते.
याशिवाय 5 राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा या ग्बोबल समिटमध्ये त्यांचे विचार मांडतील. त्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी टीवी9 नेटवर्क मंचावर त्यांच्या राज्याची सर्वच क्षेत्रातील घोडदौड आणि रोडमॅप मांडतील.
अखिलेश यादव आणि मल्लिकार्जुन खर्गे पण उपस्थित
टीव्ही 9 च्या या मंचावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल केंद्र सरकारची धोरण आणि देशातील सद्यस्थितीवर त्यांचे विचार मांडतील.
WITT वर MD-CEO बरुण दास
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे 2025 विषयी TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास म्हणाले की, ‘भारताने नेहमीच नवीन जागतिक व्यवस्थेच्या नेतृत्वात हिरारीने भूमिका घेतली आहे, जिथे ना युद्धाचा कोणताही पर्याय आहे, ना आर्थिक राष्ट्रवाद, जो जगभरातील ग्राहकांसाठी अडथळे निर्माण करतो.’ ते म्हणाले की, ‘देशाला प्रथम स्थानावर ठेवण्याच्या भारताच्या आवाहनाला जागतिक स्तरावर प्रतिसाद मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आपल्या सभ्यतेच्या वारशाचा उपयोग करून जागतिक स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावू इच्छितो.’
‘भारतासाठी पुढील दशक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे उद्दिष्ठ गाठण्यासाठी देशांतर्गत आव्हाने आणि जागतिक संधींचे समाधान शोधत या घटकांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करू.’ असे दास यांनी विचार मांडले.