Israel Palestine Crisis | इस्त्राईल-पॅलेस्टाईन लढाईत भारताने घेतली ही भूमिका, पंतप्रधानांनी मांडली बाजू
Israel Palestine Crisis | इस्त्राईलवर हमास या पॅलेस्टाईनमधील संघटनेने हल्ला चढवला आहे. गाजात सक्रीय असलेल्या हमासच्या सशस्त्र दलांनी शुक्रवारी रात्री इस्त्राईलच्या काही शहरांवर हल्ला चढवला. त्यात इस्त्राईलचे सैनिकी ठिकाणे आणि घरांना लक्ष्य करण्यात आले. हमासने इस्त्राईलवर 5,000 हून अधिक रॉकेट हल्ले चढवले. भारताने या हल्ल्यात लागलीच भूमिका जाहीर केली आहे. काय म्हणाले पंतप्रधान...
नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : स्थापनेपासूनच अरब-इस्त्राईलचा वाद सुरु आहे. त्याला अनेक वर्षांच्या वादाची किनार आहे. ज्यू विरोधातील मानसिकता त्यामागील सर्वात मोठे कारण आहे. पॅलेस्टाईन -इस्त्राईलमधील वाद (Israel Palestine Crisis) पण जुना आहे. दोन्ही पक्षांचा एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न सुरुच असतो. या भागात शांततेचे सर्व प्रयत्न विफल ठरले आहे. अशात काही वर्षांत अरब राष्ट्रांच्या इस्त्राईलविषयीच्या धोरणात थोडी नरमाई आली आहे. पण गाझा पट्टा अशांत आहे. येथील हमास संघटनेने शुक्रवारी रात्री इस्त्राईलवर एअर स्ट्राईक केली. रात्रीतून 5,000 हून अधिक रॉकेट हल्ले इस्त्राईलवर चढवले. इस्त्राईल अशा हल्ल्यांसाठी तयारीतच असतो. या देशाने पण पॅलेस्टाईनविरोधात युद्ध पुकारले आहे. भारताने तातडीने याप्रकरणात भूमिका (Indian PM Narendra Modi) जाहीर केली. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधानांनी जाहीर केली भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची याप्रकरणातील भूमिका जाहीर केली. इस्त्राईलवरील दहशतवादी हल्ल्याने धक्का बसला आहे. या हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियासोबत आमच्या प्रार्थना आहेत. या कठीण प्रसंगात आम्ही इस्त्राईलसोबत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. हमास या संघटनेने हल्ला केल्यानंतर इस्त्राईलने युद्धाची घोषणा केली आहे.
पंतप्रधानांनी केले ट्वीट
हमास गटाने रॉकेट हल्ला चढविल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटद्वारे भूमिका स्पष्ट केली. काही तासानंतर भारताने याप्रकरणी ठाम भूमिका जगाला कळवली. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरुन देशाला संदेश दिला आणि पॅलेस्टाईनविरोधात युद्धाची घोषणा केली.
Deeply shocked by the news of terrorist attacks in Israel. Our thoughts and prayers are with the innocent victims and their families. We stand in solidarity with Israel at this difficult hour.
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2023
आता स्टेट ऑफ वॉर
पॅलेस्टाईनचा सशस्त्र हमास दलाने सातत्याने शुक्रवारी इस्त्राईलच्या शहरांना लक्ष्य केले. त्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी गाजा पट्ट्यात युद्धाची स्थिती घोषीत केली. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असं नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी वरिष्ठ सैन्य अधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
20 मिनिटांत 5000 रॉकेट
शनिवारी सकाळी पॅलेस्टाईनच्या हमास गटाने गाझा पट्टीत हल्ला तीव्र केला. हमासने या हल्ल्याचा जबाबदारी घेतली आहे. हमासने गाझा पट्टीत जवळपास 20 मिनिटांत 5000 रॉकेट हल्ले चढवले. इस्त्राईलमध्ये घुसखोरी करत लष्कराची वाहनं ताब्यात घेतली आहे. तर इस्त्राईलच्या पाच सैनिकांना त्यांनी ओलीस ठेवले आहे. या हल्ल्यात जवळपास 5 लोक मारले गेले आणि 100 हून अधिक जण गंभीर झाले आहेत. कायमच युद्धाची परिस्थिती असल्याने इस्त्राईलने लागलीच मोर्चा सांभाळला आहे.