Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIR नंबर 68… 75 वर्षानंतरही गांधी हत्येचा एफआयआर पाहण्यासाठी गर्दी का होते?; 18 ओळीच्या एफआयआरमध्ये आहे काय?

या एफआयआरची एक नकल महात्मा गांधी राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. एफआयआरमध्ये आरोपीच्या नावाचा कॉलम रिक्त होता. मात्र, या एफआयआरमध्ये नंदलाल मेहता यांच्या साक्षीत नथुराम गोडसेचा उल्लेख आहे.

FIR नंबर 68... 75 वर्षानंतरही गांधी हत्येचा एफआयआर पाहण्यासाठी गर्दी का होते?; 18 ओळीच्या एफआयआरमध्ये आहे काय?
mahatma gandhiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 11:28 AM

नवी दिल्ली: आज बरोबर 75 वर्षापूर्वी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राजधानी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्या शरीरात तीन गोळ्या घुसल्या होत्या. पहिली गोळी शरीराला जोडणाऱ्या मणक्याच्या हड्डीच्या बाजूला साडे तीन इंच उजव्या बाजूला आणि बेंबीपासून अडीच इंच वर घुसली. दुसरी गोळी त्याच्या वर उजव्या बाजूला बरगड्यांमध्ये घुसली होती. तिसरी आणि शेवटची गोळी छातीत मणक्याच्या हाडापासून चार इंच उजव्या बाजूला लागून फुफ्फुसाला भेदून गेली होती.

सेमी ऑटोमॅटिक बॅरोटा पिस्तुलातून अत्यंत जवळून गांधीजींवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्यांच्या वाचण्याची शक्यता धूसर झाली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या डॉ. द्वारका प्रसाद भारद्वाज आणि डॉ. जीवराज मेहता यांनी महात्मा गांधींना मृत घोषित केलं. गांधी हत्येनंतर केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा

8 जणांना अटक

अवघ्या काही मिनिटातच गांधी हत्येची बातमी संपूर्ण जगात पसरली होती. हल्लेखोर नथुराम गोडसेला जागेवरच अटक करण्यात आली होती. त्यावेळी नवी दिल्ली जिल्ह्याच्या तुघलक रोड पोलीस ठाण्याचे एसएचओ इन्स्पेक्टर म्हणून दसौंदा सिंह कार्यरत होते. या हत्याकांडप्रकरणी 8 लोकांना अटक करण्यात आली होती.

गुन्हे काय?

या आठ जणांविरोधात तुघलक रोड पोलीस ठाण्यात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात तीन आरोपी पुराव्या अभावी सुटले होते. इतर तिघांना म्हणजे गोपाळ गोडसे, मदनलाल पाहवा आणि विष्णू रामकृष्ण यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

कंदिलाच्या प्रकाशात एफआयआर लिहिली

महात्मा गांधी यांच्यावर गोळी झाडल्या प्रकरणी नथुराम गोडसे आणि त्याच्यासोबत असलेल्या नारायण आप्टेला फाशी देण्यात आली. 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. या देशातील बहुचर्चित गांधी हत्याकांडाच्या एफआयआरचा नंबर होता 68.

FIR

FIR

30 जानेवारी 1948 च्या रात्री कंदिलाच्या प्रकाशात हा एफआयआर लिहिण्यात आला होता. सुरमेवाल्या पेन्सिलने उर्दुत ही एफआयआर लिहिण्यात आली होती. या एफआयआरची मूळ प्रत आजही तुघलक रोड पोलीस ठाण्यात जपून ठेवण्यात आली आहे.

75 वर्षापासून जतन

या पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि नोंदणी दस्ताऐवजाची राखण करणारे हे दोघेही गेल्या 75 वर्षापासून हा एफआयआर जतन करून ठेवण्याचं काम इमाने इतबारे करत आहेत. कारण एफआयआर गायब झाला तर त्याची जबाबदारी या दोघांवरच येणार आहे. त्यामुळे एफआयआरची काळजी घेतली जात आहे.

एफआयआर लॅमिनेट

या एफआयआरची कॉपी पाहण्यासाठी तुघलक रोड पोलीस ठाण्यात लोकांची नेहमी गर्दी असते. त्यामुळी ही एफआयआर लॅमिनेट करण्यात आली आहे. एफआयआर फाटू नये किंवा पाण्याने भिजू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

हिंदी- इंग्रजीत अनुवाद

मूळ एफआयआर उर्दू भाषेत असल्याने अनेकांना ती समजत नाही. त्यामुळे कालांतराने या एफआयआरचा हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे. लोकांना ती सहज वाचता यावी म्हणून हा अनुवाद करण्यात आला आहे.

अन् खटला भरला

30 जानेवारी रोजी बिर्ला भवनात हत्या झाल्यानंतर एका व्यक्तिला सायकलवरून तुघलक रोड पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. गांधीजींची हत्या झाल्यानंतर दिल्ली पोलीस ठाण्यातून घटनास्थळी पोहोचणारे इन्स्पेक्टर दसौंधा सिंह हे एकमेव पोलीस अधिकारी होते. त्यांच्या साक्षीवरूनच पुढे खटला भरला गेला.

यावेळी तत्कालीन पोलीस उपाधीक्षक जसवंत सिंगही उपस्थित होते. जसवंत सिंग त्यावेळी संसद मार्ग पोलीस ठाण्याचे डीएसपी होते. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी नथुराम गोडसेला पकडून रात्री तुघलक रोड पोलीस ठाण्यात आणलं होतं. त्यानंतर त्यांनी गोडसेला रात्रभर पोलीस चौकीत ठेवलं होतं.

नंदलाल मेहता यांचा उल्लेख

या एफआयआरमध्ये गांधीजींचे विश्वासू नंदलाल मेहता यांच्या नावाचाही उल्लेख आहे. नंदलाल मेहता यांच्या साक्षीमुळेही हा खटला दाखल करण्यात आला. या एफआयआरमध्ये इन्स्पेक्टर दसौंधा सिंह यांनी काही गोष्टी अंतर्भूत केल्या होत्या. कारण कायदेशीर दृष्ट्या या तथ्यांचा एफआयआरमध्ये समावेश होणे गरजेचे होते.

18 ओळीचा एफआयआर

या एफआयआरची एक नकल महात्मा गांधी राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. एफआयआरमध्ये आरोपीच्या नावाचा कॉलम रिक्त होता. मात्र, या एफआयआरमध्ये नंदलाल मेहता यांच्या साक्षीत नथुराम गोडसेचा उल्लेख आहे. ही एफआयआर रात्री 9 वाजून 45 मिनिटाने लिहिण्यात आली. ऊर्दू भाषेतील हा एफआयआर 18 ओळीत लिहिलेला आहे. या एफआयआरमद्ये शिपाई मोबाब सिंह यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.