इस्रायल-पॅलेस्टाईन मधील संघर्षामुळे भारतावर काय परिणाम होणार? कोणत्या वस्तू महागणार?
impact of Israel-Palestine conflict : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे आयात-निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. भारतात देखील याचा परिणाम होऊ शकतो. भारतात कोणत्या वस्तू महाग होऊ शकतात. काय परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या.

Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम हा भारतावरही होईल का? जर होय तर किती, कुठे आणि कसे? इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. संपूर्ण पश्चिम आशिया या युद्धाच्या तडाख्यात आल्यास त्याचा पहिला परिणाम कच्च्या तेलावर आणि त्याच्या पुरवठ्यावर होईल. कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवणे हे आव्हान असू शकते. मात्र, याबाबत आताच काही बोलणे घाईचे ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. फक्त परिस्थितीवर लक्ष ठेवावे लागेल. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया.
भारत आणि इस्रायलमधील व्यापार
इस्रायल आणि भारत यांच्यात 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तचा व्यापार चालतो. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, इस्रायलकडून $8.5 अब्जची निर्यात तक $2.3 अब्जची आयात झाली. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना आणि तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कपात केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती आधीच वाढल्या आहेत. दोन्ही देशांचा व्यापार खूप जास्त असल्याने या युद्धाचा परिणाम मर्यादित असू शकतो.
आरबीआय परिस्थितीवर लक्ष ठेवून
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या परिस्थितीवर भारत देखील लक्ष ठेवून आहे. दोघांमधील वादाचा आर्थिक परिणाम काही देशांवर होऊ शकतो. तेलाच्या किंमती वाढू शकतात. तर चलनावर ही याचा परिणात दिसून येऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यटा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
सोन्याचे भाव वाढू शकतात
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (इस्रायल-हमास युद्ध) पुरवठ्यात अडथळा येऊ शकतो. तर भारत सरकार जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी काही पावले उचलू शकते. युद्धामुळे सोन्याचे भावही वाढू शकतात.
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. संपूर्ण पश्चिम आशिया या युद्धाच्या तडाख्यात आल्यास त्याचा पहिला परिणाम कच्च्या तेलावर आणि त्याच्या पुरवठ्यावर होईल.