कटिहारच्या कलेक्टरांचा आश्चर्यचा दे धक्का : सरकारी शाळेत येऊन बसले गुपचूप
कटिहार (बिहार) : आपले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थी शिकत असतात, तर मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पालक आणि शिक्षक हे धडपडत असतात. यासाठी विद्यार्थ्यी आपले भान विसरून शिकत असतात. त्याचबरोबर शिक्षकही आपले भान विसरून शिकवत असतात. यामुळे आपल्या बाजूला कोण गेलं किंवा आपल्या बाजूला येऊन कोण बसलं याची कल्पना ना शिक्षकांना असते अनं ना त्यावर्गातील […]
कटिहार (बिहार) : आपले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थी शिकत असतात, तर मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पालक आणि शिक्षक हे धडपडत असतात. यासाठी विद्यार्थ्यी आपले भान विसरून शिकत असतात. त्याचबरोबर शिक्षकही आपले भान विसरून शिकवत असतात. यामुळे आपल्या बाजूला कोण गेलं किंवा आपल्या बाजूला येऊन कोण बसलं याची कल्पना ना शिक्षकांना असते अनं ना त्यावर्गातील विद्यार्थ्यांना (students). असाच काही थक्क आणि आश्चर्यचकीत करणारा प्रसंग बिहारच्या जिल्हातील कटिहार कुरसेला येथील दक्षिण मुरादपूर येथे समोर आला आहे. बिहारच्या कटिहारचे जिल्हाधिकारी (Collector) उदयन मिश्रा आपल्या अनोख्या कामाने सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. असाच आश्चर्यचा धक्का त्यांनी बुधवारी सरकारी शाळेच्या (school) चौथ्या वर्गातील मुलांना आणि शिक्षकांना दिला. ज्यावेळी वर्गात शिक्षक शिकवण्यात तल्लीन होते. त्यावेळी ते गुपचूप जाऊन बसले. शिक्षक फळ्यावर काहीतरी लिहीत असतानाच ते वर्गात जाऊन मागील बाकावर बसले होते. ज्यावेळी शिक्षकांनी वळून शेवटी बाकावर बसलेल्या व्यक्तीला पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. शिक्षकाने त्यांना विचारले की ते कोण आहेत? आलेल्या उत्तराने त्यांना धक्काच बसला आणि ते घामाघुम झाले.
अयोध्या प्रसाद विद्यालय
हा प्रकार बिहारच्या जिल्हातील कटिहार कुरसेला येथील अयोध्या प्रसाद विद्यालयातील आहे. येथे जिल्हाधिकारी मिश्रा कटिहारमधील प्रमुख विभागांची अचानक पाहणी करत होते. बुधवारी ते कुरसेला येथील दक्षिण मुरादपूर हायस्कूलमध्ये पोहोचले. मग शांतपणे शाळेच्या एका वर्गातल्या शेवटच्या बाकावर जाऊन मुलांसोबत बसले. त्यांनी मुलांना गप्प राहण्याचा इशारा केला होता. ज्यामुळे वर्गात कसालाही दंगा झाला नाही. त्यावेळी वर्गात शिक्षक शिकवण्यात दंग होते आणि फळ्यावर लिहीत होते. ते मुलांना धडा समजावून सांगत होते. लिहून झाल्यावर मुलांना प्रश्न विचारायला ते वळले आणि त्यांची नजर वर्गात बसलेल्या त्या अज्ञात व्यक्तीवर पडली. यावर त्यांनी लगेच त्यांचा परिचय विचारला. जिल्हाधिकार्यांनी स्वतःची ओळख करून देताच शिक्षिकाला घाम फुटला. त्यांना त्याचे आश्चर्य ही वाटले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शिक्षक यांच्या शिकविण्याच्या पद्धतीवर खुश झाल्याचे सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना काही भौतिकशास्त्राचे प्रश्न विचारले. ज्याची अचूक उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली. ज्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
जिल्हाधिकारी यांनी मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार कटिहार कुरसेला येथील शाळांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांनी स्वत: कुरसेला येथील अयोध्या प्रसाद विद्यालयाची पाहणी केली. यावेळी मागच्या दरवाज्याने ते वर्गात गेले आणि बसले. या घटनेची सध्या जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे.