Video : ‘तुमच्या दुर्गेला विवस्त्र नाचायला कुणी भाग पाडलं?’ पतियाळामधील हिंसाचारानंतर वादग्रस्त विधान

शिवसैनिकांनी शनिवारी (30 एप्रिल) पतियाळा येथे खलिस्तान मुर्दाबाद मार्चचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आमनेसामने आले होते.

Video : 'तुमच्या दुर्गेला विवस्त्र नाचायला कुणी भाग पाडलं?'  पतियाळामधील हिंसाचारानंतर वादग्रस्त विधान
वादग्रस्त विधानImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 1:51 PM

शुक्रवारी, 29 एप्रिल रोजी निहांग शिख यांनी वादग्रस्त विधान गेलं. तुमच्या दुर्गेला विवस्त्र नाचण्यासाठी कुणी जबरदस्ती केली होती? तिला कुणी भाग पाडलं होतं? असं विधान त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. प्रो पंजाब टीव्हीसोबत (Pro Punjab TV Channel) बोलत असताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. हजारो हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची टीका सोशल मीडियातून (Social Media) उठण्यास सुरुवातही झाली आहे. पतियाळामध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे गंभीर पडसाद उमटण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. गुरु गोविंद सिंग जी यांनी ज्या खालसा पंथाची स्थापना केली, तो सर्व धर्माचा गुरु आहे, असंही निहांग शिख म्हणाले आहे. त्यांनी हिंदू धर्माबद्दल (Hindu Religion) बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे, असं म्हणत त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. हेमकुंठ पर्वतातील वाईट लोकं कोण? दुर्गैला विवस्त्र नाचायला कुणी भाग पाडल? तिला वाचवलं कुणी? हे आधी विचारा? जेव्हा राक्षसांनी इंद्रदेवाचं घर लुटलं, तेव्हा दुर्गैला विवस्त्र नृत्य करण्यास कुणी भाग पाडलं? असे सवाल निहंग शिख यांनी केले आहेत. निहांग शिख यांनी केलेल्या विधानानं आगीत तेल ओतण्याचं काम केलंय, अशी प्रतिक्रिया आता सोशल मीडियात उमटू लागली आहे.

मंदिरात गोळीबार करणारे कोण आहेत, त्यांना शोधा किंवा मग हातात बंदुका घ्या आणि शिखांचा मार्ग मोकळा करा, असंही निहांग शिख म्हटलंय. तुमची काली माता कुठे लपली आहे, ते आम्ही बघून घेऊ, असंही म्हणालेत. याबाबत त्यांनी नानक सिंह आणि प्रशासनालाही सवाल उपस्थित केलेत.

निहंग शीखची क्लिप व्हायरल

दरम्यान, प्रो पंजाब टीव्हीनं शेअर केलेला हा वादग्रस्त व्हिडीओ माथी भडकणारा असल्यानं तो फेसबुकवर डिलीट करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल साईट्सवरुन अपलोड करुन व्हायरल केला जाऊ लागला आहे. ट्वीटरवरुन मोहन सिंह नरुका यांनी हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला असून यावरुन आता पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यताय.

पाहा व्हिडीओ : आक्षेपार्ह विधानं

वाद नेमका काय?

शिवसैनिकांनी शनिवारी (30 एप्रिल) पतियाळा येथे खलिस्तान मुर्दाबाद मार्चचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यात तारेवरची कसरत करावी लागली होती. यावेळी पोलिसांसमोरच दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. काहींनी तर तलवारी काढून हवेत मिरवल्या. त्यामुळे आणखीनच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पंजाब शिवसेनेचे माजी कार्यकारी प्रमुख हरीश सिंगला यांना शुक्रवारी संध्याकाळी अटकही करण्यात आली होती. हरिश सिंगलांवर बेकायदा मोर्चा काढणे आणि हिंसा भडकवणे, असे आरोप लावण्यात आले आहेत.

पाहा व्हिडीओ : तणावपूर्ण स्थिती

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.