कोणाला दिली जाते Z+ सुरक्षा, किती असतो त्याचा महिन्याचा खर्च?
भारतात अनेक मोठे नेते आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. ज्यामध्ये अनेक पोलीस आणि कमांडो दिसतात हे तुम्ही पाहिलेच असेल. पण तुम्हाला माहित आहे का की देशात सुरक्षा कोणाला आणि कशी मिळते? चला जाणून घेऊया कोणाला मिळते Z प्लस सुरक्षा.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना आता ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल खान यांच्याविरोधात निदर्शने केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता Z Plus सुरक्षा म्हणजे काय? कोणत्या लोकांना हे संरक्षण दिले जाते आणि यासाठी किती खर्च येतो जाणून घ्या.
Z+ सुरक्षा म्हणजे काय?
Z+ सुरक्षा ही देशातील सर्वोत्तम सुरक्षा मानली जाते. ही सुरक्षा देशातील अतिमहत्त्वाच्या लोकांना दिली जाते. Z+ सुरक्षेत 10 पेक्षा जास्त NSG कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह 55 प्रशिक्षित कर्मचारी असतात. ज्यांना ही सुरक्षा मिळते, हे सर्व कमांडो त्या व्यक्तीभोवती 24 तास असतात. सुरक्षेसाठी तैनात असलेला प्रत्येक कमांडो हा मार्शल आर्टमध्ये तज्ञ असतो. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे देखील असतात.
कोणाला Z+ सुरक्षा मिळाली?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना हे सुरक्षा कवच दिले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना देखील झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
Z+ सुरक्षेचा खर्च किती?
Z+ सुरक्षेसाठी प्रति व्यक्ती 40 ते 45 लाख रुपये प्रति महिना खर्च येतो. या सुरक्षेचा खर्च केंद्रीय गृह मंत्रालय उचलतो. अंबानी कुटुंब मात्र त्यांचा खर्च स्वत: उचलतात.
Z+ संरक्षण कोणाला दिले जाते?
ज्य़ांना धोका अधिक त्यांना ही सुरक्षा दिली जाते. SPG म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप नंतर हे दुसरे सर्वात कडक सुरक्षा कव्हर आहे. पंतप्रधानांनी एसपीजीची सुरक्षा असते.