Pooja Singhal : काळ्या पैशाचे किती भागीदार, एकाचवेळी 5 राज्यात छापेमारी; आयएएस पूजा सिंगल प्रकरणात उघडलं रहस्य
ईडीने खाण सचिवांवर कारवाई केल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधकांनी जोरदार हल्ला केला आहे. खाण लीज प्रकरणात सोरेन स्वतः अडचणीत आले आहेत. आता खाण सचिव भ्रष्टाचारात अडकल्यानंतर त्यांची चिंता वाढली आहे.
नवी दिल्ली – झारखंड (Jharkhand) राज्यातील आयपीएस अधिकारी पूजा सिंघल (Pooja Singhal) यांची अंमलबजावणी संचालनालय (ED) चौकशी करत आहे. ईडीने यापूर्वीच सीए सुमन कुमार याला ताब्यात घेतले आहे. तसेच सीएला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीच्या चौकशी दरम्यान सुमन कुमार घरी तब्बल 17 कोटी रूपये सापल्यानंतर अधिकारी देखील चक्रावून गेले होते. आज सीए सुमन कुमार यांना ईडी कार्यालयात आणण्यात आले आहे. ईडीच्या पथकाने रांचीमध्ये छापा टाकला. तेव्हा मोठ्या प्रमाणात घरातून नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे सापडलेले पैसे मोजण्यासाठी तीन नोटा मोजण्याचे यंत्र लागले होते. ज्यावेळी संपुर्ण नोटा मोजल्या त्यावेळी तो आकडा 19 कोटी 31 लाखांवर येऊन थांबला होता.
एकाच दिवशी पंचवीस ठिकाणी छापेमारी करायची होती
2009-10 मध्ये झारखंडमधील मनरेगा घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी ही छापेमारी सुरू केली. झारखंड, बिहार, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये तपास यंत्रणेने एकाच वेळी छापे टाकले. झारखंडच्या खाण आणि उद्योग सचिव पूजा सिंघल, त्यांचे पती अभिषेक झा, सीए सुमन कुमार आणि इतर काही कर्मचारी सुमारे 25 ठिकाणी छापे टाकण्याचे ईडीच्या पथकाचे ठरले होते.
छाप्यात 19.31 कोटी जप्त करण्यात आले
छाप्यात हे 19 कोटी 31 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सीएच्या घरातून 19 कोटी 31 लाख रुपयांपैकी 17 कोटी वसूल करण्यात आले. उर्वरित रक्कम एका कंपनीकडून मिळाली आहे. आयएएस पूजा सिंघल यांच्या घरीही अनेक महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे सापडल्याची माहिती मिळाली आहे, त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. झारखंडच्या खाण सचिव IAS पूजा सिंघल यांच्या अधिकृत घरावर छापा टाकण्यात आला. तर त्यांचे पती अभिषेक झा यांच्या रांची येथील रुग्णालयावरही छापा टाकण्यात आला. एकाचवेळा छापेमारी केल्याने ईडीच्या हाती बरीच कागदपत्रे लागली आहेत.
सुमारे दीडशे कोटींच्या गुंतवणुकीची बातमी
आएएस पूजा सिंघल आणि त्यांच्या पतीवर सुरू असलेल्या कारवाईत साधारण 150 कोटींच्या गुंतवणुकीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. झारखंड राज्यात अनेक महानगरांमध्ये मालमत्ता आढळून आल्या आहेत. अनेक फ्लॅटमध्ये गुंतवणुकीचे पुरावे सापडले आहेत. रांची, धनबाद, खुंटी, झारखंडमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी घोटाळ्या संदर्भात पुरावे शोधले आहेत. त्यानंतर एक टीम बिहारच्या मुझफ्फरपूरच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या सासरच्या घरी पोहोचली आहे.
सीएम हेमंत सोरेन यांना घेराव घातला
ईडीने खाण सचिवांवर कारवाई केल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधकांनी जोरदार हल्ला केला आहे. खाण लीज प्रकरणात सोरेन स्वतः अडचणीत आले आहेत. आता खाण सचिव भ्रष्टाचारात अडकल्यानंतर त्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे भविष्यात मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
झारखंडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे
निवडणूक आयोगाच्या नोटीसनंतर हेमंत सोरेन यांची चिंता वाढली आहे. विरोधक सातत्याने मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. राज्यात अनेकजण खाण लीजबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत राज्याच्या खाण सचिव पूजा सिंघल यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर झारखंडचे राजकारणही तापले आहे.