पंतप्रधान मोदी यांच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडले, कोण आहेत कृष्णा मडिगा ? रडण्याचं कारण काय?
विविध राज्यातील विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजत असताना एका निवडणूक रॅलीतील कृष्णा मडिगा यांच्या भावूक होण्याचा आणि पीएम मोदी यांनी त्यांचे सांत्वन करण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तेलंगणा | 12 नोव्हेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद येथील तेलंगणात एका निवडणूक रॅलीत भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी व्यासपीठावर तेलंगणातील भाजपा नेत्यांनी राज्यात मडिगा समुदायावर होत असलेल्या अन्याय आणि दुलर्क्षाबद्दल वक्त्यांनी भाषणे केली. तेव्हा मोदी यांच्या शेजारी बसलेले स्थानिक नेते मंदा कृष्णा मडिगा भावूक झाले. त्यांना अश्रु आवरले नाहीत. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना सावरत त्यांना शांत केले.
विविध राज्यातील विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजत असताना एका निवडणूक रॅलीतील कृष्णा मडिगा यांच्या भावूक होण्याचा आणि पीएम मोदी यांनी त्यांचे सांत्वन करण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून साल 2019 चा चंद्रयान-2 मोहिम फेल गेल्यानंतर इस्रोचे तत्कालीन प्रमुख सिवन यांच्या भावूक होण्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना सावरत असल्याचा प्रसंग युजरना आठवत आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
#WATCH | Telangana: PM Modi consoles MRPS (Madiga Reservation Porata Samiti) chief Manda Krishna Madiga, who got emotional during a public rally in Hyderabad pic.twitter.com/mikvyuR1sW
— ANI (@ANI) November 11, 2023
कोण आहेत ? कृष्णा मडिगा ?
मंदा कृष्णा मडिगा तेलंगणा येथील एक दलित नेते आहेत. आणि ते मडिगा रिझर्व्हेशन पोराटा समितीचे प्रमुख देखील आहेत. आरक्षण पोराटा समितीची स्थापना तेलंगणाच्या स्थापनेच्या अनेक वर्षे आधी प्रकाशम जिल्ह्यात झाली होती. तेव्हा हा जिल्हा आंध्रप्रदेशात होता. आता हा जिल्हा तेलंगणा राज्याचा एक हिस्सा आहे. तेलंगणा राज्यात मडिगा हा समुदाय अनुसूचित जातीतील सर्वात मोठा घटक मानला जातो.
तेलंगणाचे सर्वात मोठे दलित नेते
कृष्णा मडिगा यांचा समावेश राज्यातील सर्वात मोठ्या दलित नेत्यात होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलित त्यांना मोदींच्या शेजारील खुर्ची दिली होती. तेलंगणात मडिगा समूदाय चामडे व्यवसायात आहे. त्यामुळे त्यास वंचित समूह मानले जाते. मडिगा समिती गेल्या अनेक वर्षांपासून एससी कॅटगरीतील आरक्षणात वेगळ्या कोट्याची मागणी करीत आहे.
साल 2013 पहिल्यांदा मोदींना भेटले
मडिगा यांची साल 2013 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पहिली भेट झाली होती. भाजपाने साल 2014 च्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात मडिगा समुहाला आरक्षण देण्याचे वचन दिले होते. परंतू भाजपाला विजय मिळाला नाही. त्यामुळे हे आश्वासन काही पूर्ण झाले नाही. हैदराबाद येथील मोदी यांची रॅली कृष्णा मडिगा यांच्या संघटनेने आयोजित केल्याचे म्हटले जात आहे.