LIC एजंट ते अब्जाधीश, कोण आहेत फोर्ब्सच्या यादीत नाव असलेले लक्ष्मण दास मित्तल

Who is Lachhman Das Mittal: सोनालिका ग्रुपच्या ट्रॅक्टरचे प्लँट 5 देशांमध्ये आहेत. कंपनी 120 देशांमध्ये ट्रॅक्टरची विक्री करते. आता मित्तल कंपनीचे दैनंदीन कामकाज पाहत नाही. त्यांचा मुलगा अमृत सागर कंपनीचा व्हाईस चेअरमन आहे. तसेच लहान मुलगा दीपक व्यवस्थापकीय संचालक आहे.

LIC एजंट ते अब्जाधीश, कोण आहेत फोर्ब्सच्या यादीत नाव असलेले लक्ष्मण दास मित्तल
lachhman das mittal
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 10:36 AM

कधीकाळी एलआयसी विमा एजंट असणारे उद्योजक लक्ष्मण दास मित्तल चर्चेत आले आहेत. 2024 मध्ये फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत (Forbes Billionaires List 2024) त्यांचा समावेश झाला आहे. देशातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश उद्योजक ते ठरले आहेत. यापूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे माजी चेअमरन केशब महिंद्रा देशातील सर्वात वयोवृद्ध उद्योजक होते. त्याचे 12 एप्रिल 2023 रोजी वयाच्या 99 वर्षी निधन झाले. त्यामुळे मित्तल सर्वात वयोवृद्ध उद्योगपती झाले आहे. त्यांची यशोगाथा एखाद्या हॉलीवूड चित्रपटाप्रमाणे आहे. निवृत्तीनंतर म्हणजे वयाच्या 60 वर्षी ते LIC मधून निवृत्त झाल्यावर उद्योजक बनले. आता मित्तल 25 हजार कोटी रुपयांचे मालक आहेत.

मारुती उद्योगाची डीलरशिपचा प्रयत्न

लक्ष्मण दास मित्तल सोनालिका ग्रुप (Sonalika Group) चे चेअरमन आहेत. सोनालिका ग्रुप देशातील तिसरी मोठी ट्रॅक्टर निर्माती कंपनी आहे. मित्तल यांचा जन्म पंजाबमधील होशियारपूरमध्ये 1931 झाला. त्यांनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) चे विमा एंजट म्हणून आपले काम सुरु केले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. त्यात त्यांनी पहिला क्रमांक मिळवला होता. त्यांच्या डोक्यात नेहमी उद्योजक होण्याचे विचार येत होता. त्यामुळे त्यांनी मारुती उद्योगाची डीलरशिप घेण्याचा प्रयत्न केला. परंतु यश मिळाले नाही. 1990 मध्ये 60 वर्षी एलआयसी एजंट म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचा गंभीरतेने विचार सुरु केला.

मित्तल यांनी आपल्या बचतीमधून शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या मशीन निर्मिती करणारी कंपनी सुरु केली. मग 1996 मध्ये मोठी झेप घेत इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड (ITL) कंपनी स्थापन केले. वयाच्या 66 वर्षी 1996 मध्ये सोनालिका ट्रॅक्टर्स सुरु केले. शेतकऱ्यांना हे टॅक्ट्रर चांगलेच आवडले. आता सोनालिका ग्रुपच 25 हजार कोटींची कंपनी आहे. ग्रुपचे टॅक्टर भारतातच नाही तर विदेशातही विक्रीसाठी जात आहेत.

हे सुद्धा वाचा

5 देशांत प्लँट, 120 देशांमध्ये निर्यात

सोनालिका ग्रुपच्या ट्रॅक्टरचे प्लँट 5 देशांमध्ये आहेत. कंपनी 120 देशांमध्ये ट्रॅक्टरची विक्री करते. आता मित्तल कंपनीचे दैनंदीन कामकाज पाहत नाही. त्यांचा मुलगा अमृत सागर कंपनीचा व्हाईस चेअरमन आहे. तसेच लहान मुलगा दीपक व्यवस्थापकीय संचालक आहे. त्यांचे नातू सुशांत आणि रमन कंपनीचे कामकाज पाहत आहेत.

हे ही वाचा

कॉलेजची विद्यार्थीनी बनली जगातील सर्वात युवा अब्जाधीश, कोण आहे लिविया वोइगट

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.