कोण आहे मुकेश अंबानी यांची भाची, हजारो कोटींची मालकीन प्रसिद्धी पासून राहते लांब
Mukesh Ambani : जगातील टॉप उद्योगपतींच्या यादीत मुकेश अंबानी यांचा देखील समावेश होतो, त्यांनी केलेली प्रगती आज अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे. मुकेश अंबानी यांचं कुटुंब देखील नेहमीच चर्चेत राहतं. मुकेश अंबानी यांनी एक भाची देखील आहे जे खूप कमी लोकांना माहितीये. कोण आहे मुकेश अंबानी यांची भाची जाणून घ्या.
Nayantara Kothari : मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत सध्या दुसऱ्या स्थानावर आहेत. अंबानी कुटुंब हे भारतात नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अंबानी कुटुंबातील लग्न असोत किंवा इतर कोणते कार्यक्रम ज्याला मोठी मोठी मंडळी हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या मुलांचा लग्न सोहळा देखील चर्चेचा विषय ठरली होती. कारण ती देशातील सर्वात महागडे लग्न सोहळा होते. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब त्यांची जीवनशैलीमुळे देखील चर्चेत राहतात. व्यावसायिक जगतात अंबानी कुटुंब गुंतलेले आहेत. त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणजे नयनतारा कोठारी. मुकेश अंबानी यांची ती भाची आहे. मुकेश अंबानी यांची बहीण नीना कोठारी यांची ती मुलगी आहे. नीना कोठारी यांनी 1986 मध्ये भद्रश्याम कोठारी यांच्याशी विवाह केला होता. त्यांना दोन मुले आहेत – मुलगा अर्जुन कोठारी आणि मुलगी नयनतारा कोठारी.
नयनताराचे लग्नाआधीचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर समोर आले होते. पण कोठारी कुटुंब हे प्रसिद्धीपासून लांब राहतात. मुकेश अंबानी यांची भाची असून देखील ते जास्त प्रसिद्धीत राहत नाहीत. नयनतारा कोठारी यांचा विवाह बिझनेसमन शमित भरतियासोबत झाले आहे. ते जुबिलंट ग्रुप आणि एचटी मीडिया ग्रुप चालवतात.
शमित भरतिया हिंदुस्तान मीडिया व्हेंचर्सचे माजी संचालक आणि ज्युबिलंट इंडस्ट्रीजचे नॉन-एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. या दोन्ही ग्रुपची स्थापना त्यांच्या वडिलांनी केली होती. सध्या त्यांची मार्केट कॅप 37000 कोटींहून अधिक आहे.
हे पण वाचा : कोण आहे मुकेश अंबानी यांचा भाचा विक्रम साळगावकर? प्रसिद्धी पासून राहतात लांब
मुकेश अंबानी यांच्या भाचीचे लग्न एका मोठ्या कुटुंबात झाले आहे. कारण त्यांची सासू सासू शोभना भरतिया हे आघाडीचे वृत्तपत्र आणि मीडिया समूह हिंदुस्तान टाईम्स चालवतात. तर सासरे यांनी जुबिलंट फूडवर्क्सने डॉमिनोज आणि डंकिन डोनट्स सारखे आयकॉनिक ब्रँड भारतात आणले. त्यामुळे त्यांच्या सासरची मंडळी देखील उद्योग समुहातील मोठे नाव आहे.