INDIA | विमानात शरद पवार आणि बैठकीत सोनिया गांधी यांच्या शेजारी बसलेली ही महिला कोण?
INDIA | 'साहेबा'ची अत्यंत विश्वासू म्हणून ओळखली जाते. तिने अनेकांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. ही महिला पवारांसोबत बंगळुरुच्या फ्लाइटमध्ये दिसली.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 ची रणनिती ठरवण्यासाठी बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली. यात 26 पक्ष सहभागी झाले होते. NCP कडून शरद पवार या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत एक महिला होती. तिने अनेकांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. ही महिला पवारांसोबत बंगळुरुच्या फ्लाइटमध्ये दिसली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक सुरु होती, त्यावेळी सुद्धा ही महिला बैठकीत सहभागी झाली होती. ही महिला कोण आहे? त्या बद्दल जाणून घेऊया.
ही महिला NCP च्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष सोनिया दुहन आहे. शरद पवार यांनी याच महिन्यात जुलैमध्ये तिच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. 30 वर्षाची सोनिया हरियाणाच्या हिसारची निवासी आहे.
NCP च्या संपर्कात कशी आली?
कुरुक्षेत्र यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेताना तिने विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. पुण्यामध्ये असताना, ती NCP च्या संपर्कात आली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दुहन यांच राजकीय वजन वाढत गेलं.
हॉटेलमधून 4 आमदारांना बाहेर काढलं
सोनिया दुहन सर्वप्रथम 2019 मध्ये चर्चेत आली होती. तिने राष्ट्रवादीच्या यूथ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मासोबत मिळून गुरुग्रामच्या हॉटेलमधून 4 आमदारांना बाहेर काढलं व पुन्हा दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी घेऊन आली होती. हे चारही आमदार अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले होते. नंतर पुन्हा शरद पवार यांना या आमदारांनी पाठिंबा दिला.
विश्वासू अशी ओळख
सोनिया दुहन या महाराष्ट्रातील नेत्यांच्या फार संपर्कात नसतात. एनसीपीच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची विश्वासू अशी सोनियाची ओळख आहे. INDIA नाव कसं दिलं?
बंगळुरुत दोन दिवस चाललेल्या बैठकीत विरोधी पक्षाच्या आघाडीच नाव निश्चित झालं. त्यांनी INDIA हे नाव दिलं आहे. इसमें I- इंडियन, N- नॅशनल, D- डेवलपमेंटल, I- इन्क्लूसिव आणि A- एलायंस असा अर्थ आहे. ‘आमची लढाई ही भाजपाच्या विचारधारे विरोधात आहे’, असं बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतान राहुल गांधी म्हणाले. “भाजपामुळे देशाच नुकसान होतय. युवकांना रोजगार मिळत नाहीय. देशाची स्थिती ठीक नाहीय” असं ते म्हणाले.