President Election2022 – शरद पवार राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी का देतायेत वारंवार नकार? काय आहे गेम प्लॅन? वाचा पाच कारणे

शरद पवारांनी जरी आत्ता राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारली असली, तरी त्यांच्या मनात काय आहे, हे त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाला माहित नसते, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. पवार जेव्हा एखादी गोष्ट हो म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ नाही असा असतो, आणि ते जेव्हा नाही असे म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ हो असा घ्यायचा असतो, असे जाणकारांचे मत आहे.

President Election2022 - शरद पवार राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी का देतायेत वारंवार नकार? काय आहे गेम प्लॅन? वाचा पाच कारणे
Pawar for President electionImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 4:46 PM

नवी दिल्ली – पुढील महिनाभरवर असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (President Election 2022)चर्चेत असलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar)काही दिवसांपूर्वीच यापासून स्वताला दूर केले आहे. बुधवारी ममता बॅनर्जी (Mamta Banarjee)यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली. या बैठकीत आणि त्यापूर्वीही ही राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी, असा आग्रह विरोधकांकडून त्यांना करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र शरद पवारांनी नम्रतेने ही ऑफर नाकारल्याची माहिती आहे. ही बैठक सुमारे दोन तास चालली. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची नामांकन प्रक्रिया बुधवारपासून सुरु होणार आहे. दुसरीकडे अशीही बातमी आहे की शरद पवार यांनी अजून एक दुसरी बैठक बोलावली आहे. ही बैठक २० किंवा २१ जूनला मुंबईत होण्याची शक्यता आहे. जर शरद पवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू इच्छित नाही, तर त्यांनी ही निवडणूक का बोलावली असेल, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आपण नाही, असे शरद पवार यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जाहीर केले होते. पवार यांच्या या वक्तव्याने विरोधकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. काँग्रेसनेही पवारांच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता.

ममतांनी बोलावलेल्या बैठकीला कुणाकुणाची होती उपस्थिती?

ममता यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रे, सपा, एनसीपी, डीएमके,शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि डाव्या पक्षांचे नेते उपस्थित होते. तर आम आदमी पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती, शोरमणी आकाली दल आणि बिजू जनता दल यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. या बैठकीत उमेदवार होण्याची सर्व विरोधकांनी मागणी शरद पवारांनी फेटाळल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी

तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अस भाजपाचा प्रयत्न आहे.यासाठी भाजपाचे नेते विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधीत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासाठी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. भाजपाचा उमेदवार कोण आहे, त्याचे नाव समोर यावे, अशी विरोधकांची इच्छा आहे. राजनाथ ,सिंह यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र एनडीएचा उमेदवार असण्यापेक्षा विरोधकांच्या उमेदवाराचा स्वीकार एनडीएने करावा, असा सूर काँग्रेसने आळवला आहे.

पवारांचा वरतून नकार, पण मनात काय?

शरद पवारांनी जरी आत्ता राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारली असली, तरी त्यांच्या मनात काय आहे, हे त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाला माहित नसते, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. पवार जेव्हा एखादी गोष्ट हो म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ नाही असा असतो, आणि ते जेव्हा नाही असे म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ हो असा घ्यायचा असतो, असे जाणकारांचे मत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत पवार त्यांचे पत्ते उघडे करत नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पवारांनी नकार दिला म्हणजे ते निवडणूक लढवणारच नाहीत, असा त्याचा अर्थ घेता येणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

शरद पवारांना खरचं राष्ट्रपती का व्हायचे नाही, काय आहेत कारणे?

1. सक्रिय राजकारणातून नवृत्ती नको

शरद पवार यांची ओळख ही लोकनेता अशी आहे. जनतेत वावरणारा नेता, त्यांचे प्रश्न समजणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रपतीपद मिळाल्यानंतर सक्रिय राजकारणातून निवृत्ती असेच त्याच्याकडे पाहिले जाते. शरद पवार यांचे नाव यापूर्वीही एक-दोनदा चर्चेत आले आहे, त्यावेळीही त्यांनी सक्रिय राजकारणातून इतक्या लवकर निवृत्ती नको, असे सांगत नम्रतेने तेव्हाही ऑफर नाकारली होती. केवळ राष्ट्रपती भवनात राहणे आणि प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत फारसे महत्त्व नसलेले पद पवारांसारख्या व्यक्तीला नको असण्याचीही शक्यता आहे. सामान्य जनतेशी त्यांचा असलेला संपर्कही या पदामुळे तुटेल, असे त्यांना वाटत असावे. असे जाणकार सांगतात.

2. निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी

राष्ट्रपती निवडणूक एनडीएसमोर जिंकणे सोपे नसल्याचे शरद पवारांना माहित आहे, हेही यातील एक महत्त्वाचे कारण मानण्यात येते. कारण विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ विरोधकांकडे नाही. लोकसभेत विरोधकांची मते तुलनेत कमी आहेत. राज्यसभेत आणि विधानसभेत विरोधकांची परिस्थिती बरी आहे. दुसरीकडे विरोधकांतही एकजूट दिसत नाहीये. अशा स्थितीत रिस्क घेण्याची पवारांची तयारी तूर्तास तरी दिसत नाहीये.

3. नरेंद्र मोदींशी संबंध बिघडण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात सौहार्दाचे संबंध आहेकत. अशा स्थितीत युपीए किंवा विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणे, हे थेट मोदींना आव्हान ठरु शकते. त्यामुळे उमेदवार म्हणून रिंगणात उतरुन मोदींशी संबंध बिघडवून घेण्याची पवारांची तयारी नसल्याचे सांगण्यात येते आहे.

4. 2024 लोकसभा निवडणूक महत्त्वाची

शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी महराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. पवारांचीही ती महत्त्वाकांक्षा असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत 2024 सालच्या लोकसभा निवडणुकांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती आहे. तिसरी आघाडी उभारुन भाजपाला लढत देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळेही 2024 सालच्या निवडणुकांसाठी ते तयारी करत असल्यामुळे त्यांना राष्ट्रपती पद नको असण्याची शक्यता आहे.

5.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून अंतर नको

राज्यात त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अनेक गट-तट आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील छुप्या संघर्षाबाबतही अनेकदा चर्चा होते. अशा स्थितीत पवार राष्ट्रपती झाले, तर राज्यात पक्षात फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्यामुळेही पवार या पदासाठी इच्छुक नसल्याची शक्यता आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.