ISRO चे सर्व मोठे मिशन्स श्रीहरिकोटामधूनच का लॉन्च होतात? Chandrayaan 3 नंतर आता आदित्य एल-1
After Chandrayaan-3 ISRO Aditya L1 Mission | मोठ्या मिशनच्या लॉन्चिंगसाठी श्रीहरिकोटाची निवड करण्यामागे काय कारण आहे?. श्री हरिकोटा भारतातील एक खास जागा आहे. त्यामुळे इस्रोने आपले मिशन्स लॉन्च करण्यासाठी ही जागा निवडली आहे.
बंगळुरु : चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर ISRO ने आता आदित्य एल-1 लॉन्चिंगची घोषणा केली आहे. 2 सप्टेंबरला श्री हरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन लॉन्चिंग होणार आहे. भारताच हे पहिलं सोलर मिशन आहे. या मिशनच्या लॉन्चिंगसाठी पुन्हा एकदा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने श्री हरिकोटाची निवड केली आहे. श्रीहरिकोटा भारताच लॉन्चिंग स्टेशन आहे. 1971 नतंर इस्रोने जेवढे मोठे मिशन्स केलेत, त्या सगळ्याच्या लॉन्चिंगसाठी याच लॉन्चिंग पॅडचा वापर केला आहे. श्री हरिकोटा आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. या बेटाला भारताच प्रायमरी स्पेस पोर्टही म्हटलं जातं.
श्रीहरिकोटा सुल्लुरपेटा मंडलमध्ये आहे. भारतीय अवकाश विज्ञानासाठी ही खूप महत्त्वाची जागा आहे. 1971 मध्ये श्रीहरीकोटा येथे सतीन धवन अवकाश केंद्र तळाची स्थापना झाली होती. भारताच्या नुकत्याच यशस्वी ठरलेल्या चांद्रयान-3 मिशनच लॉन्चिंग याच तळावरुन झालं होत. याआधी इस्रोच्या महत्त्वाच्या मिशन्ससाठी याच तळाचा वापर झालाय. चांद्रयान-3 ने 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पुष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच चंद्रावर वेगाने संशोधन कार्य सुरु आहे.
श्रीहरिकोटा इतकं खास का आहे?
श्रीहरिकोटा येथे सतीन धवन अवकाश केंद्र आहे. इस्रो आपल्या सर्व मिशन्सच लॉन्चिंग इथूनच करतो. हे स्थान इक्वेटर म्हणजे भूमध्य रेषेच्या जवळ आहे. जे स्पेस क्राफ्ट किंवा सॅटलाइट पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये फिरत आहेत, त्यांना इक्वेटरच्या जवळूनच इंजेक्ट केलं जातं. श्री हरिकोटा येथून रॉकेट लॉन्च केल्याने मिशनचा सक्सेस रेट वाढतो. मिशनचा खर्च सुद्धा कमी होता.
श्री हरिकोटाला असलेल्या समुद्राचा फायदा काय?
अवकाश मिशन लॉन्च करण्यासाठी स्पेस पोर्ट गर्दी, लोकांची फारशी वदर्ळ नसलेल्या ठिकाणी बनवलं जातं. श्री हरिकोटा अशा मिशन्ससाठी एक परफेक्ट जागा आहे. आंध्र प्रदेशशी जोडलेलं हे एक बेट आहे. श्री हरिकोटाच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे. इथून लॉन्च केल्यानंतर कुठल्याही रॉकेटचे अवशेष समुद्रात पडतात. मिशनला कुठला धोका असेल, तर रॉकेटला समुद्राच्या दिशेने वळवून जीवीतहानीचा धोका टाळता येतो. हवामान सुद्धा एक कारण
स्पेस मिशनच्या लॉन्चिंगसाठी श्री हरिकोटा निवडण्यामागच एक कारण हवामान सुद्धा आहे. हे एक बेट आहे. इथे हवामान बऱ्याचदा सामान्यच असतं. पावसाळ्याचा सीजन सोडला, तर दहा महिने इथे ऊन असतं. म्हणूनच इस्रोची पहिली पसंती श्रीहरिकोटाला आहे.