Seema Haider | पाकिस्तानी सीमा हैदरने हिंदू धर्म स्वीकारला, तर तिला भारतीय नागरिकता मिळेल ? कायदा काय सांगतो?

Seema Haider | सीमा हैदरच्या विषयात अनेक प्रश्न उपस्थित होतायत. ती भारतात राहू शकते की, नाही? पाकिस्तानातून येणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी कायदा काय आहे? तिने मुस्लिम धर्म सोडून, हिंदू धर्म स्वीकारला तर नियमात सवलत मिळेल का?

Seema Haider | पाकिस्तानी सीमा हैदरने हिंदू धर्म स्वीकारला, तर तिला भारतीय नागरिकता मिळेल ? कायदा काय सांगतो?
Seema Haider
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 11:49 AM

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर सीमा हैदरची चर्चा आहे. भारतात प्रियकरासोबत राहण्यासाठी तिने चार मुलांसह बेकायदरित्या भारतात प्रवेश केला. तिने आपल्या मुलांची नाव बदलली व आता धर्म बदलण्यासाठी तयार आहे. भारतात बेकायद पद्धतीने प्रवेश केल्याबद्दल तिच्याविरोधात FIR सुद्धा झाला. या प्रकरणात तिला जामीन मिळाला असून सध्या ती सचिन मीणा या प्रियकराच्या नोएडा येथील घरी आहे.

सीमा हैदर प्रकरणात भारतात अनेक प्रश्न उपस्थित होतायत. ती भारतात राहू शकते की नाही? पाकिस्तानातून येणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी कायदा काय आहे? तिने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला तर तिला नियमात सवलत मिळेल का?

भारतात प्रवेशाचे नियम काय आहेत?

भारतात प्रवेश करण्यासाठी अनेक नियम आहेत. पासपोर्ट एक्ट 1920 नुसार, त्या व्यक्तीकडे पासपोर्ट असला पाहिजे. वीजा घेतला पाहिजे. भारतात राहण्यासाठी परवानगी असली पाहिजे. फॉरेनर कायदा 1946 नुसार, परदेशी नागरिक भारतात आले, तर ते वीज असेपर्यंतच इथे राहू शकतात.

सीमाला भारतीय नागरिकत्व मिळेल ?

भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे काही नियम आहेत, असं वकील आशिष पांडे यांनी सांगितलं. भारतात संविधान लागू झालं, त्यावेळी जे कोणी भारतात होते, त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं. तुमचा जन्म भारतात झाला, तर तुम्हाला या देशाच नागरिकत्व मिळतं.

भारतात राहणारा मुलगा दुसऱ्या देशातील मुलीसोबत लग्न करतो किंवा परदेशात राहणाऱ्या मुलीने भारतीय मुलासोबत लग्न केलं, तर ते भारताच नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करु शकतात.

भारतात तुम्ही 10-15 वर्षापासून राहताय, तर नागरिकत्वासाठी अर्ज करु शकता. अशा प्रकरणात तुम्ही भारतात बेकायद प्रवेश केला नसेल, तरच तुम्हाला नागरिकत्व मिळू शकतं.

CAA कायदा काय सांगतो?

सिटीजन अमेंडमेंट एक्टनुसार, (CAA) तुम्ही पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि शेजारी देशात अल्पसंख्यांक म्हणून राहत होता. धर्मावरुन तुम्हाला त्रास दिला असेल. 31 डिसेंबर 2014 पर्यंत तुम्ही भारतात आला असाल, तर तुम्हाला नागरिकत्व मिळू शकतं. त्या देशात तुमचं अल्पसंख्यांक असणं ही त्यासाठी सर्वात मोठी अट होती. वरील निकषात सीमा हैदर कुठेही फिट बसत नाहीय. वर्तमान परिस्थितीच्या आधारावर नागरिकता देता येणार नाही.

धर्म बदलला तर तिला नागरिकत्व मिळेल का?

सीमा हैदरने तिचा धर्म बदलला, तर तिला भारतीय नागरिकत्व मिळेल का? या प्रश्नावर वकील आशिष पांडे म्हणाले की, धर्म बदलला, तरी तिला कोणताही दिलासा मिळणार नाही. कारण हा 2014 नंतरचा विषय आहे. भारतात राहणाऱ्या मुलीच पाकिस्तानी तरुणाबरोबर बरोबर किंवा पाकिस्तानी तरुणीच भारतात राहणाऱ्या मुलाबरोबर लग्न होतं, अशावेळी नागरिकत्व मिळतं, पण सीमा हैदरच्या बाबतीत विषय दुसरा आहे. सीमा हैदरला भारताच नागरिकत्व मिळवण्यासाठी काय कराव लागेल?

सीमा हैदरला कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल. तिने कोर्टाकडे क्षमा याचना केली, ती मंजूर झाली, तर भारत सरकार विचार करेल. त्यासाठी तिला कायदेशीर सोपस्कर पूर्ण करावे लागतील.

तिला भारतीय पुरुषासोबत लग्न करायच असेल, तर तिला तिच्या नवऱ्याला घटस्फोट द्यावा लागेल. त्यानंतर तिला भारतीय व्यक्तीसोबत लग्न कराव लागेल. त्यानंतर ती भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करु शकते. भारतीय व्यक्तीसोबत कायदेशीर विवाह केला, तर तिला नागरिकत्व मिळू शकते.

...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.