Monsoon : पुन्हा आशादायी..! मान्सून बदलतोय आपले रुपडे, आठवड्याच्या शेवटी काय होणार बदल? वाचा सविस्तर

आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. आता या आठवड्याच्या शेवटापासून संपूर्ण राज्यात मान्सून हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी आठवडा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. दरवर्षी खरिपाच्या पेरण्या ह्या 21 जूनपासून सुरु होत असतो. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे आता चित्र बदलले तर 21 जूनला पेरणीचे मुहूर्त शेतकरी साधणार आहे.

Monsoon : पुन्हा आशादायी..! मान्सून बदलतोय आपले रुपडे, आठवड्याच्या शेवटी काय होणार बदल? वाचा सविस्तर
आता मराठवाड्यातही पाऊस सक्रीय होत आहे.
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 5:59 PM

मुंबई : दिवसाकाठी (Meteorological Department) हवामान विभागाकडून मान्सूनबाबत वेगळा अंदाज वर्तवला जात आहे. (Monsoon) मान्सूनचा प्रवास नेमका कसा राहणार याबाबत सर्वाच्याच मनात उत्सुकता निर्माण होत आहे. शिवाय आतापर्यंत पावसाने अनेक विभागाात हुलकावणी दिल्याने आगामी काळात काय चित्र राहणार हे (Kharif Season) खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे आहे. आठवड्याच्या शेवटी मान्सून आपले रुपडे बदलत आहे. दक्षिण कोकणात मध्यम तर उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिलासादायक म्हणजे ज्या भागात मान्सून पाठ फिरवली आहे त्या भागातही तो सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई-ठाणे परिसरात पावसाची हजेरी

कोकणातून दाखल झालेला पाऊस अजून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे फिरकलेलाच नाही. मात्र, बुधवारपासून मुंबई ते ठाणे परिसरात हलक्या स्वरुपाच्या सरी बरसल्या आहेत. जूनचा पंधरवाडा उलटला तरी राज्यातील सर्वदूर भागात पाऊस हा सक्रीय झालेला नाही. विदर्भ, मुंबई, उपनगरे, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग वगळता इतर ठिकाणी मान्सूनचा लहरीपणा पाहवयास मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

मान्सून बदलतोय, शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा

आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. आता या आठवड्याच्या शेवटापासून संपूर्ण राज्यात मान्सून हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी आठवडा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. दरवर्षी खरिपाच्या पेरण्या ह्या 21 जूनपासून सुरु होत असतो. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे आता चित्र बदलले तर 21 जूनला पेरणीचे मुहूर्त शेतकरी साधणार आहे. शेतकऱ्यांसह कृषी विभागाची संपूर्ण तयारी झाली असून प्रतिक्षा आहे ती अपेक्षित पावसाची.

कोकणासाठी पोषक वातावरण

राज्यात सर्वत्र मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसणार असला तरी कोकणावर मात्र कृपादृष्टी राहणार आहे. यापूर्वीही 19 जून रोजी कोकणात अलर्ट जारी करण्यात आला असताना दक्षिण कोकणात अधिकचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. आगामी आठवड्यापासून पाऊस सक्रीय झाला तर रखडलेली पेरणी कामे पुन्हा जोमात सुरु होणार आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षित पावसाची प्रतिक्षा आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.