WITT: यामी गौतमने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक; कोणत्या योजनेमुळे झाली प्रभावीत?
टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री यामी गौतम देखील सहभागी झाली आहे, यावेळी बोलताना तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. भारत मंडपममध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यावेळी बोलताना अभिनेत्रीने आपलं करिअर, करिअरमध्ये आलेले चढ-उतार याबाबत सांगितले. यामी गौतमने 2024 मध्ये प्रदर्शित झालेला तिचा चित्रपट आर्टिकल 370 वर बोलत असताना पंतप्रधान मोदी याचं कौतुक केलं आहे. तसेच तिला भारत सरकारची कोणती योजना सर्वाधिक आवडली याबाबत देखील तिने सांगितलं आहे.
यामी गौतमने 2024 मध्ये प्रदर्शित झालेला तिचा चित्रपट आर्टिकल 370 वर बोलताना म्हटलं की मी खरच खूप भाग्यवान आहे, मला एवढी मोठी संधी मिळाली. एक कलाकार म्हणून व्यक्त होण्याची संधी मिळाली. हा चित्रपट खरच खूप इंटरेस्टिंग आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या भाषणाचं समर्थन करते, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, प्रयत्न करणं गरजेचे असतात. देशाची एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे की, मी सरकारच्या योजनांचं समर्थन केलं पाहिजे, त्यामध्ये योगदान दिलं पाहिजे.
यामी गौतमने यावेळी बोलताना मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमाचं कौतुक केलं. मोदीजींचा स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम खूप खास आहे. मी याचं एक छोटं उदाहरण देते, मी प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर नाही करू शकत.हिमाचल प्रदेशमध्ये आमचं एक छोटंसं घर आहे. तिथे आम्ही सगळ्या मुलांना एकत्र करून, चॉकलेट, टॉफी असे पदार्थ खाऊ घालतो. त्यावेळी ती छोटी मुलं मला सांगतात की, तुम्ही पण रॅपर फेकू नका आणि कोणाला फेकू पण देऊ नका, या छोट्या -छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, ज्यामधून लहान मुलांना शिकवण मिळते. असं यामी गौतमने यावेळी म्हटलं आहे.