आई आई.. चिमुकलीने फोडला टाहो ! Reel च्या नादात 16 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, Video
उत्तरकाशी येथे एक महिला तिच्या कुटुंबियांसह फिरायला आली होती. तेथे नदीच्या काठावर उभं राहून ती रील बनवत होती तर तिची मुलगी समोरच उभी होती. तेवढ्यात... रील बनवण्याच्या नादात एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त झालं. नदीकाठी नेमकं काय घडलं ?

आजकाल ज्याच्याकडे पहाव त्याच्याकडे मोबाईल असतो आणि लोकं आपले त्यात डोकं खुपसून बसलेले असतात. त्यापैकी बऱ्याच लोकांना रील बनवण्याचीही आवड असते. मात्र ही आवड कधी व्यसनात बदलली तर त्याच Reel पायी Real (खरं) आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. सोशल मीडियावरील असाचा एक व्हिडीओ समोर आला असून तो पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल. नदीजवळ उभं राहून Reel शूट करण्याच्या नादात असं काही घडलं की… तिथे नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात एक वेदनादायक घटना घडली आहे. तेथे मणिकर्णिका घाटावर तिच्या कुटुंबासह आलेली एक महिला रील नदीच्या पाण्यात उभं राहून रील बनवत होती. तर तिचे कुटुंबीय, मुलगी समोरच उभे होते. मात्र रील बनवण्याच्या नादात त्या महिलेचा पाय घसरून तोल गेला आणि ती थेट नदीच्या पाण्यात पडली. पोहता येत नसल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत ती वाहून गेली. समोर उभी असलेल्या तिच्या चिमुकल्या मुलीने आई, आई हाक मारत टाहो फोडला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ती महिला वाहून गेली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
कुटुंबासह फिरायला आली पण..
मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्दैवी घटना उत्तरकाशी च्या मणिकर्णिका घाटावर सोमवारी दुपारी घडली. संबंधित महिला नेपाळची असल्याचे समजते. ती येथे तिच्या कुटुंबियांसह फिरायला आली होती. भागीरथी नदीच्या पाण्यात उतरून ती महिला रील बनवत होती. मात्र रीलच्या नादात तिचं रिअल आयुष्यच पणाला लागलं.
कोणत्याही सुरक्षा उपाययोजनेशिवाय ती महिला नदीत उतरली होती आणि बघता बघता तिने रील्स बनवण्यास सुरूवात केली, मात्र अचानकच तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात धपकन पडली. पाणी खूप गार होतं आणि पाण्याचा प्रवाहदेखील जोरदार होता.
रील जीवावर बेतलं, थरारक व्हिडीओ समोर
रील्स बनवा रही थी, जिंदगी से हाथ धो बैठी..
वीडियो #उत्तराखंड के उत्तरकाशी के मणिकर्णिका घाट का बताया जा रहा है। जहाँ रील्स बनवा रही 35 वर्ष की विशेषता गंगा के तेज़ बहाव मे बह गई। वीडियो की बैकग्राउंड मे बेटी मम्मी मम्मी पुकारती हुई सुनी जा रही है।
एसडीआरएफ व क्यूआरटी ने नदी व… pic.twitter.com/h3OcXF4vuX
— Dileep Yadav । दिलीप यादव 🇮🇳 (@yadavdileepdev) April 16, 2025
या संपूर्ण घटनेचा थरार त्या मोबाईलच्या व्हिडीओतही कैद झाला. ती महिला अचानक पाण्यात पडल्याने कोणालाच काही सुचलं नाही. तर त्या महिलेची समोर घाटावर उभी असलेली मुलगी ते दृश्य पाहून भेदरली, आई-आई अशी हाक मारत राहिली पण उशीरा झाला होता. या घटनेची सूचना मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई केली आणि एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने, मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली. तथापि, बचाव पथकाने मोठ्या प्रमाणात शोध घेऊनही, महिलेचा शोध लागला नाही. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून त्या महिलेच्या कुटुंबावर तर दु:खाचा डोंगरच कोसळला.
सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात आणि त्यापायी आयुष्यात काय घडू शकतं हे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
