AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terrorist Attack : ‘किती बेशर्म आहेत’, पेहेलगाम हल्ल्यावर महिला पर्यटकाच वादग्रस्त वक्तव्य, मोठा वाद

Pahalgam Terrorist Attack : 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानच्या भेकड दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले. बैसारन खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत.

Pahalgam Terrorist Attack : 'किती बेशर्म आहेत', पेहेलगाम हल्ल्यावर महिला पर्यटकाच वादग्रस्त वक्तव्य, मोठा वाद
Pahalgam Terrorist Attack Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 25, 2025 | 12:52 PM
Share

काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप आहे. हा आतापर्यंतचा काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला मोठा हल्ला आहे. यात 26 निरपराध लोकांचा मृत्यू झालाय. या दरम्यान काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात काही महिला अस काही बोलून गेल्या की, सोशल मीडियावर यूजर्स भडकले. या महिलांची युजर्सनी शाळा घेतली. ‘थोडी शी गडबड’, ‘छोटीशी गोष्ट’ अशी वाक्य वापरुन या महिलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची भयानकता, गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला असा आरोप नेटीझन्सनी महिलांवर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काश्मीरच्या कुठल्यातरी हॉटेलमध्ये महिला पर्यटकांचा ग्रुप दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला हसत, हसत बोलतेय की, आम्ही लोक इथे काश्मीरला आलो आहोत. भरपूर मजा करतोय. इथे पहलगाममध्ये थोडीशी गडबड झालीय. तरीही काही अशी गोष्ट नाहीय. तुम्ही सुद्धा या. त्यानंतर दुसरी एक महिला बोलते, असं थोड बहुत चालूच असतं. त्यावर अन्य महिला मान हलवून आपली सहमती देतात.

जे पाहून नेटीझन्स भडकले

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये काही पर्यटक हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की, ते हल्ल्याच्या एकदिवसानंतर काश्मीर फिरत आहेत. त्या जागेच्या सौंदर्याबद्दल लोकांना सांगत आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडिया X वर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जे पाहून नेटीझन्स भडकले आहेत.

यांची जीभ अडखळली नाही का?

अशा एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना यूजरने लिहिलय की, लाज वाटली पाहिजे. या गोष्टीतून तुमचं संगोपन दिसून येतं. दुसऱ्या युजरने म्हटलं किती बेशर्म आहेत, थोडीशी गडबड आणि असं चालू असतं बोलते. हे बोलताना यांची जीभ अडखळली नाही का?. एका अन्य यूजरने लिहिलय, हे देवा! ही काय बोलतेय.

पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे. बैसारन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यानंतर भारताने आपल्या शेजारी देशाविरोधात अनेक निर्णय घेतले आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.