अद्भूत, अलौकिक क्षण! स्वप्न साकार झाले… गडकरी आणि अदानी यांचं भावूक ट्विट चर्चेत
आशियातील आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष औतम अदानी यांनी राम मंदिरात अभिषेक करण्यापूर्वी आपल्या ट्विटद्वारे सामान्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज या शुभ मुहूर्तावर जेव्हा अयोध्येच्या राम मंदिराचे दरवाजे उघडतील तेव्हा ते देश आणि परदेशासाठी ज्ञान आणि शांतीचे प्रवेशद्वार बनू दे.
मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (Pranpratistha) सोहळ्याबाबत देशभरात उत्साह आहे. देशभरातील मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधानांव्यतिरिक्त देशातील आघाडीचे उद्योगपती, चित्रपट कलाकार आणि इतर अनेक लोक अयोध्येला पोहोचले आहेत. दुसरीकडे, देशातील आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी अयोध्या प्राण प्रतिष्ठापूर्वी एक हृदयस्पर्शी ट्विट केले आहे. गौतम अदानी यांनी आपल्या ट्विटद्वारे देशातील लोकांची मने कशी जिंकली त्या ट्विटमध्ये काय लिहले आहे ते जाणून घेऊया.
अदानी यांनी आपल्या ट्विटने लोकांच्या मनाला स्पर्श केला
आशियातील आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष औतम अदानी यांनी राम मंदिरात अभिषेक करण्यापूर्वी आपल्या ट्विटद्वारे सामान्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज या शुभ मुहूर्तावर जेव्हा अयोध्येच्या राम मंदिराचे दरवाजे उघडतील तेव्हा ते देश आणि परदेशासाठी ज्ञान आणि शांतीचे प्रवेशद्वार बनू दे. गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त अंबानी कुटुंब आणि देशातील प्रसिद्ध उद्योगपतीही अयोध्येत पोहोचले आहेत.
On this auspicious day, as the Ayodhya Mandir’s doors open, let it be a gateway to enlightenment and peace, binding the communities with the timeless threads of Bharat’s spiritual and cultural harmony. pic.twitter.com/3MzcKiI8GG
— Gautam Adani (@gautam_adani) January 22, 2024
देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल
जेफरीजच्या ताज्या अहवालानुसार, देशाच्या पर्यटन परिसंस्थेला अयोध्या आणि राम मंदिराच्या रूपाने एक नवीन हॉट स्पॉट मिळाला आहे. अयोध्येच्या मेकओव्हरसाठी 80 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च येईल असा अंदाज आहे. त्याअंतर्गत अयोध्येत विमानतळ आणि रेल्वेसह हॉटेल्सही बांधली जात आहेत. ग्रीनफिल्ड सिटीची स्थापना होत आहे. यासोबतच रस्ते जोडणीही सुधारली जात आहे. या खर्चामुळे देशातील पर्यटकांच्या संख्येत 5 कोटींहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
नितीन गडकरींने केले भावूक ट्विट
आश्चर्यकारक, अलौकिक क्षण! स्वप्न सत्यात उतरले!
अयोध्या धाममध्ये कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामजींच्या भव्य, दिव्य आणि अद्वितीय मंदिराचे बांधकाम हे रामराज्याकडे वाटचाल करणारे भारतातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे! पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि सर्व आदरणीय संत आणि धार्मिक नेते यांच्या उपस्थितीत रामललाचा अभिषेक होत आहे. मन प्रसन्न आणि रोमांचित होत आहे असं नितीन गडकरी म्हणाले.
अद्भुत, अलौकिक क्षण! सपना हुआ साकार!
करोड़ों भारतवासियों🇮🇳 के आराध्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम जी के भव्य-दिव्य और नव्य मंदिर🛕 का अयोध्या धाम में निर्माण होना रामराज्य की ओर बढ़ते भारत का एक महत्वपूर्ण कदम है।
इस खुशी को शब्दों में व्यक्त करना कठिन है! प्रधानमंत्री श्री… pic.twitter.com/MRpyn0qUjA
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 22, 2024
हजारो कारसेवक आणि रामभक्तांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली आहे. प्रभू श्री रामाच्या या मंदिरासाठी शतकानुशतके संघर्ष आणि त्याग करणाऱ्या सर्व कारसेवकांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो. नवीन भारताच्या उभारणीसाठी सांस्कृतिक पुनर्जागरणासाठी आपली वचनबद्धता सिद्ध करणाऱ्या आदरणीय पंतप्रधानांचे खूप खूप आभार! समस्त देशवासियांच्या वतीने त्यांना विनम्र कृतज्ञता! असं भावून ट्विट नितीन गडकरी यांनी केले.