AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरएसएसला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही; राहुल गांधींनी दिलं ‘हे’ कारण!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. (Won't call RSS Sangh Parivar: Rahul Gandhi in latest attack)

आरएसएसला 'संघ परिवार' म्हणणार नाही; राहुल गांधींनी दिलं 'हे' कारण!
rahul gandhi
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 11:49 AM

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. मी आरएसएसला संघ परिवार म्हणणार नाही. कारण संघात महिलांचा आणि बुजुर्गांचा सन्मान होत नाही, असं राहुल यांनी म्हटलं आहे. राहुल यांनी थेट संघाच्या कार्यप्रणालीवरच बोट ठेवल्याने त्यावर टीकेची झोड उठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Won’t call RSS Sangh Parivar: Rahul Gandhi in latest attack)

राहुल गांधी यांनी ट्विट करून हा निशाणा साधला आहे. मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित संघटनांना परिवार म्हणणे योग्य नाही. कुटुंबात महिला असतात. बुजुर्गांचा सन्मान होतो. करुणा आणि स्नेहाची भावना असते. संघात नेमकी त्याचीच वाणवा आहे. त्यामुळे आता मी संघाला संघ परिवार म्हणणार नाही, असं राहुल यांनी म्हटलं आहे. यापूर्वी राहुल यांनी संघाशी संबंधित शाळांची पाकिस्तानच्या कट्टर इस्लामिक मदरशांशी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचं वादळ उठलं होतं.

संघाच्या शाळांना पैसा कुठून येतो?

यापूर्वी राहुल गांधी यांनी संघाच्या शाळांवरूनही संघावर टीका केली होती. संघाने त्यांच्या शाळेच्या माध्यमातून हल्ला सुरू केला आहे. पाकिस्तानमधील कट्टरपंथी इस्लामवादी मदरशांचा जसा वापर करतात तसाच संघाने सुरू केला आहे. आपल्या शाळा खूप वेगळ्या असल्याचं संघ भासवत असतो. पण या शाळांसाठी पैसा येतो कुठून हे कोणीच विचारत नाही. आर्थिक लाभ उठवणाऱ्या या शाळा नाहीत, त्यामुळे कोणीच हा प्रश्न विचारत नाहीत, असा टोला राहुल यांनी लगावला होता.

नितीशकुमार संघमय

राहुल यांनी बिहार विधानसभेतील हाणामारीवरही भाष्य केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजप आणि संघमय झाले आहेत. लोकशाहीचं वस्त्रहरण करणाऱ्यांना सरकार म्हणण्याचा काहीच अधिकार नाही. मात्र तरीही विरोधी पक्ष जनहितासाठी आवाज उठवतच राहिल. आम्ही घाबरत नाही, असं सांगतानाच हुकूमशाहीचा विजय आहे, लोकशाहीचा परायज आहे, हा नितीश कुमार यांचा बिहार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. (Won’t call RSS Sangh Parivar: Rahul Gandhi in latest attack)

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत: संजय राऊत

शरद पवारांनी काँग्रेसचा ‘तो’ प्रस्ताव नाकारला; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मदतीला जाणार?

AAP ला धक्का, आमदार सोमनाथ भारतींना 2 वर्षांचा तुरुंगवास, कारण काय?

(Won’t call RSS Sangh Parivar: Rahul Gandhi in latest attack)

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.