कुस्तीपटूंना आता भविष्याचं टेन्शन; सिनियर्स लोकांचे हे हाल तर आमचं काय..?

कुस्तीकडे बघण्याचा आणि कुस्तीसारख्या खेळाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन पसरत आहे. कुस्तीपटूंबरोबर ज्या प्रमाणे गैरवर्तन केले असले तरी जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या पैलवानांकडे कोणते ना कोणते ठोस पुरावे असतीलच याची हमीही महिला प्रशिक्षकांनी दिली

कुस्तीपटूंना आता भविष्याचं टेन्शन; सिनियर्स लोकांचे हे हाल तर आमचं काय..?
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 12:14 AM

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर रविवारी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झालेल्या वादावादीनंतर आता अनेक प्रशिक्षक आणि तरुण कुस्तीपटूंच्या तिखट आणि भावूक प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. या दुर्देवी या घटनेचा सगळ्या खेळावर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया युवा खेळाडूंनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबीयांनीही सवाल करण्यास उपस्थित करत आहेत. कुस्तीच्या प्रशिक्षकाने रविवारची घटना लज्जास्पद असल्याची खंत व्यक्त केली आहे. याबद्दल ते म्हणतात की काल जी घटना घडली आहे,

त्या घटनेमुळे होतकरू आणि तरुण कुस्तीपटूंच्या कुटुंबीयांना आता त्यांच्या मुला-मुलींच्या भवितव्याची काळजी सतावू लागली आहे.

खेळाडू आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादावादीच्या घटनेनंतर युवा खेळाडू गीतांजली चौधरीने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांबद्दल बोलण्यास नकार दिला आहे.

मात्र ज्या पद्धतीने पोलिसांनी खेळाडूंबरोबर जे वर्तन केले आहे, ते वर्तन अत्यंत चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या या कारवाईवर आता सवाल उपस्थित करत महिला प्रशिक्षकांनी आता पोलिसांच्या कारवाईबद्दल निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की, सरकार पैलवानांबरोबर ज्या प्रकारे गैरवर्तन केले आहे ते अत्यंत वाईट आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

दिल्ली पोलिसांनी या प्रकारची वागणूक त्यांनी का दिली आहे ते समजत नव्हते, कारण कोणत्याही कुस्तीपटूंनी त्यांच्यावर हल्ला केला नव्हता, किंवा त्यांच्याबरोबर उद्धटपणाचे वर्तनही केले नव्हते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंवर दाखल केलेला गुन्हा पूर्णपणे चुकीचा आहे.

कुस्तीपटूंना जबरदस्तीने ओढून बसमध्ये बसवण्यात आले होते, आणि त्याचबरोबर त्यांच्या समर्थनाथ निघालेल्यांनाही पोलिसांनी अमानुषपणे ताब्यात घेतले होते.

दिल्ली पोलिसांच्या कालच्या वर्तनाबद्दल बोलताना महिला प्रशिक्षक म्हणाल्या की, कुस्तीपटू जंतरमंतरवरून आंदोलनासाठी चालताना त्यांच्याबरोबर गैरवर्तन करण्यात आले होते. कुस्तीपटू साक्षीला रस्त्यावर फेकून तिच्या चेहऱ्यावर अक्षरशः पाय ठेवण्यात आला होता.

त्यामुळे आता या कुस्तीकडे बघण्याचा आणि कुस्तीसारख्या खेळाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन पसरत आहे. कुस्तीपटूंबरोबर ज्या प्रमाणे गैरवर्तन केले असले तरी जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या पैलवानांकडे कोणते ना कोणते ठोस पुरावे असतीलच याची हमीही महिला प्रशिक्षकांनी दिली आहे. त्यामुळे सरकारने आता पैलवानांचे म्हणणे ऐकून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.