कुस्तीत दोनदा ऑलिम्पिक, आडदांड पैलवानांना लोळवलं; पण पोलिसांचा खाक्या बसताच सुशील कुमार रडला
कुस्तीच्या मैदानात आडदांड पैलवानांना लोळवत दोनदा ऑलिम्पिक पदक आणि कॉमनवेल्थमध्ये तिनदा सुवर्णपदक मिळवणारा हरियाणाचा कुस्तीपटू सुशील कुमार पोलिसी खाक्या दिसल्यावर अक्षरशः रडल्याचं पाहायला मिळालं.
नवी दिल्ली : कुस्तीच्या मैदानात आडदांड पैलवानांना लोळवत दोनदा ऑलिम्पिक पदक आणि कॉमनवेल्थमध्ये तिनदा सुवर्णपदक मिळवणारा हरियाणाचा कुस्तीपटू सुशील कुमार पोलिसी खाक्या दिसल्यावर अक्षरशः रडल्याचं पाहायला मिळालं. कुस्तीपटू सागर धनखर हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या फरार सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. त्यानंतर न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि इथूनच पोलिसांनी आपला खाक्या दाखवत तपासाची चक्रं वेगानं फिरवायला सुरुवात केलीय (Wrestler Sushil Kumar cry duting investigation of Sagar Dhankhar murder).
38 वर्षीय कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात पोलिसांनी अजामिनपात्र वॉरंट काढलं होतं. मात्र, काही दिवस सुशील कुमार फरार राहिला. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत कठोरपणे चौकशी केली. दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने पोलिसी खाक्या दाख यावेळी त्याच्यावर रडण्याची वेळ आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमार आणि सहआरोपी त्याचा मित्र अजय बक्करवाला यांना तीन ठिकाणी नेऊन चौकशी करण्यात आली. यात मॉडल टाऊन, शालीमार बाग आणि छत्रसाल स्टेडियम या ठिकाणांचा समावेश आहे.
गुन्हा घडला तिथं आरोपीला नेऊन पोलिसांकडून सखोल चौकशी
दिल्ली पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगल तपासत आहेत. जेथे हत्या झाली तेथेही पोलीस सुशील कुमारला घेऊन गेले. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी छत्रसाल स्टेडियमवरुन पीडित कुस्तीपटू सागर धनखर आणि सोनूला मॉडल टाऊनमधील एका फ्लॅटमध्ये घेऊन आले होते. पोलिसांनी आरोपींना तेथे नेऊन चौकशी केली. सुशील कुमार राहत असलेल्या शालीमार येथील फ्लॅटवर नेऊनही चौकशी झाली.
“सुशील कुमारकडून छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या घटनेची कबुली”
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमारने छत्रसाल स्टेडियमवर झालेली घटना मान्य केलीय. मात्र, आपण केवळ दोन गटात झालेल्या वादात त्यांना वाचवत होतो, असा दावा सुशील कुमारने केला. याशिवाय सागर धनखर आणि सोनूला फ्लॅटवर आणण्याबाबत कबुली दिली नाही. गुन्हा करताना सुशील कुमारने वापरलेली गाडी आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळावर पोहचलं.
पीडित कुस्तीपटूला इतकं मारलं की पोलीस पोहचण्याआधीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमारने काही गँगस्टरसोबत छत्रसालच्या स्टेडियमच्या बेसमेंटला सागरला बेदम मारहाण केली. तसेच याचा व्हिडीओ देखील शूट केला. हा व्हिडीओ दाखवून आपल्या वाट्याला गेल्यावर आपण काय करतो हे दाखवत त्याला लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा त्यांचा हेतू होता. पीडित सागरला इतकी जबर मारहाण झाली की घटनास्थळावर पोलीस पोहचूपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे पोलिसांना सागरचा जबाब देखील घेता आला नाही. पीडित सागरच्या दोन मित्रांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय.
हेही वाचा :
हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक पदकं काढली जाणार? वाचा सविस्तर
Sushil Kumar | फरार पैलवान सुशील कुमारला अखेर अटक, 18 दिवसांचा शोध संपला
पैलवान सुशील कुमार अद्यापही फरार, अटकेच्या बातम्या चुकीच्या
व्हिडीओ पाहा :
Wrestler Sushil Kumar cry duting investigation of Sagar Dhankhar murder