कुस्तीपटूंचे आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित ; क्रीडा मंत्र्याने दिले मोठे अश्वासन

15 जूननंतर कारवाई झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाच्या आम्ही विचारात आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितले. काही मुद्यांवर सरकारशी बसून चौकशी करण्यात आली आहे.

कुस्तीपटूंचे आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित ; क्रीडा मंत्र्याने दिले मोठे अश्वासन
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 1:03 AM

नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. या बैठकीत पैलवानांनी आपल्या 5 मागण्या ठेवल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी ब्रिजभूषण यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. कुस्तीपटूंच्यावतीने बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी अनुराग यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. कुस्तीपटू आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्यामध्ये जवळपास 5 तास चर्चा झाली आहे. त्यानंतर साक्षी मलिकने आंदोलनाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कुस्तीपटूंचे हे आंदोलन 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई झाली नाही तर पुन्हा हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, चर्चेदरम्यान सरकारने त्याच्याकडून 15 जूनपर्यंतची वेळ मागितली आहे.

15 जूनपर्यंत तपास करण्यात येणार असल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र पुनिया यांनी सांगितले की, सध्या तपास आणि इतर गोष्टी सरकारकडून पूर्ण झाल्या नाहीत.

त्यामुळे 15 जूननंतर कारवाई झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाच्या आम्ही विचारात आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितले. काही मुद्यांवर सरकारशी बसून चौकशी करण्यात आली आहे.

मात्र जे क्रीडा मंत्र्यांनी जे आज दाखवले ते आधीच त्यांनी करायला पाहिजे होते असंही त्यांनी यावेळी सांगितले. 28 मे रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान कुस्तीपटूंवर दाखल करण्यात आलेले गुनेहाही मागे घेण्यात येणार असल्याचे पुनिया यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, काल त्यांनी सरकारच्यावतीने कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर आज त्यांच्याबरोबर एक दीर्घ चर्चाही झाली आहे.

ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करून 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. यासोबतच खेळाडूंच्या राहिलेल्या मागण्यांचाही गांभीर्याने विचार केला जाणार असून त्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे असंही त्यांना यावेळी सांगितले.

खेळाडूंच्या भेटीनंतर सरकारकडून बोलताना त्यांनी सांगितले की, या सर्व गोष्टी खुलेपणाने केल्या आहेत. त्यामुळे ही बैठक सकारात्मक झाली असल्याचेही त्यांना बोलून दाखवले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.