लग्नाच्या अवघ्या १० दिवसांपूर्वी तिने नातं मोडलं, रिक्षा चालकाला असा शॉक बसला की…

लग्नाला अवघे दहा दिवस उरलेले असतानाच, भावी वधूने नवऱ्याला नकार देत ते लग्न न करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र तिच्या या नकारामुळे त्या तरूणाला इतका मोठा शॉक बसला की... त्यानंतर जे घडलं ते वाचून तुम्हालाही हळहळ वाटेल.

लग्नाच्या अवघ्या १० दिवसांपूर्वी तिने नातं मोडलं, रिक्षा चालकाला असा शॉक बसला की...
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 12:21 PM

कानपूर | 21 नोव्हेंबर 2023 : साखरपुडा ते लग्न… प्रत्येक जोडप्यासाठी एक सुवर्णकाळ.. या कोर्टशिप काळात एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवून, एकमेकांचे विचार जाणून घेण्याची संधी. लग्न ठरलेल्या जोडप्यांसाठी हा काळ खूप खास असतो. प्रत्येकालाच आपल्या भावी जोडीदाराला भेटायची खूप इच्छा, उत्सुकता असते. लग्नानंतर खऱ्या संसाराला सुरूवात होते, प्रेम मागे पडतं, आणि रूटीनच्या चक्रात आपण अडकतो. त्यामुळे साखरपुडा ते लग्न सगळे भरभरून एन्जॉय करतात. पण काही वेळा असा एखादा टर्न येतो, की संपूर्ण आयुष्यच बदलून जातं.

कानपूरमध्येही असंच काहीसं घडलं. लग्नाला अवघे दहा दिवस उरलेले असतानाच, भावी वधूने नवऱ्याला नकार देत ते लग्न न करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र तिच्या या नकारामुळे त्या तरूणाला इतका मोठा शॉक बसला की त्याचा जीवच गेला. हो, ही दुर्दैवी घटना अगदी खरी आहे. तरूणीने लग्नास नकार दिल्यामुळे अवघ्या 23 वर्षांच्या तरूणाचा शॉकने मृत्यू झाला. यामुळे त्याच्या घरच्यांवर तर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. ज्या घरात अवघ्या काही दिवसात शहनाईचे सूर वाजणार होते, तिथे आता फक्त आहे आक्रोश आणि मातम…

बाहेर गेल्यावर झाला वाद आणि तिने...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम बाबू असे मृत तरूणाचे नाव असून तो कानपूर जवळील काकादेव येथील पाल बस्ती येथे रहायचा. तो ई-रिक्षा चालवायचा. 29 नोव्हेंबर रोजी त्याचं लग्न लागणार होतं. घरात त्याचीच धामधूम सुरू होती, सगळेजण तयारीत व्यस्त होते. मात्र 18 नोव्हेंबरला श्याम हा त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत बाहेर गेला होता. तिथे काही कारणावरून त्यांचं भांडण झालं आणि तिने त्याच्याशी लग्न करायला थेट नकारच दिला.

घरी आल्यावर बिघडली तब्येत

त्यानंतर प्रेम कसाबसा घरी पोहोचला. लग्न मोडल्याचं ऐकून घरी सगळेच हबकले. पण प्रेम काहीच बोलला नाही. रविवारी संध्याकाळी मात्र त्याची तब्येत अचानक खूपच बिघडली. कुटुंबियांनी त्याला तातडीने कानपूरच्या लाला लजपत राय रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारांदरम्यान रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तरण्या-ताठ्या मुलाचा असा अचानक जीव गेल्याे, त्याच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. हॉस्पिटलमध्ये एकच हल्लकल्लोल माजला.

तरूणाच्या कुटुंबाचा तरूणीवर आरोप

त्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी, जिने ठरलेलं लग्न मोडलं, ती तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर छळ केल्याचा आणि प्रेमकडून पैसे उकळल्याचा आरोप केला. तिच्यामुळेच आमच्या मुलाचा जीव गेला, असा आरोपही त्यांनी लगावला. संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर कठोर कारवाईची मागणी करत त्यांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तक्रार आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे काकडेदेव पोलिस स्टेशनचे प्रभारी मानवेंद्र सिंह यांनी सांगितले.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.