AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parliament Attack | संसदेवर हल्ल्याची या संघटनेने दिली होती धमकी, कोणाशी आहे कनेक्शन?

Parliament Attack | नवीन संसद भवनात आज 13 डिसेंबर रोजी चार तरुणांनी मोठा गदारोळ माजवला. त्यातील दोन तरुणांनी तर लोकसभा सभागृहात स्मोक स्मोक क्रॅकरचा वापर केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. लोकसभेवरील हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाले. त्याच दिवशी हा प्रकार समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. दरम्यान या घटनेपूर्वीच संसदेवर हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.

Parliament Attack | संसदेवर हल्ल्याची या संघटनेने दिली होती धमकी, कोणाशी आहे कनेक्शन?
| Updated on: Dec 13, 2023 | 4:00 PM
Share

नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : नवीन संसेदत घुसून दोन तरुणांनी मोठा धुडगूस घातला. तर इतर दोघांनी संसद परिसरात गदारोळ माजवला. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च सदनातील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली. दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेत लोकसभा सभागृहात गोंधळ घातला. दोघांनी पायाच्या बुटातून स्मोक क्रॅकर बाहेर काढल्या. त्यामुळे सभागृहात पिवळा धूर पसरला. काही खासदारांनी अध्यक्षांकडे जाणाऱ्या या तरुणांना पकडले आणि सुरक्षा रक्षकांच्या हवाली केले. संसदेवर हल्ला करण्याची धमकी यापूर्वीच मिळाली होती. त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्थेतील घोडचूक असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे.

कोणी दिली धमकी

खलिस्तानचा दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा मुख्य गुरपतवंत सिंग पन्नू याने गेल्या मंगळवारी, 6 डिसेंबर रोजी संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. सध्या पन्नू भारतासाठी मोस्ट वाँटेड आहे. त्याच्यावर हल्ला करुन त्याला संपविण्याचा कट भारताने रचल्याचा आरोप अमेरिकेतील काही सनदी अधिकाऱ्यांनी केला होता. पण भारताने हे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात कारवाया करणारे अनेक जण मारल्या गेल्याने हा आरोप करण्यात येत आहे.

दिल्ली बनेगा खलिस्तान

13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याची आठवण करुन देणारा व्हिडिओ दहशतवादी पन्नू याने दाखवला आणि असा हल्ला पुन्हा होऊ शकतो अशी धमकी दिली होती. त्याने 2001 मधील संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुचे पोस्टर पण झळकावले. दिल्ली बनेगा खलिस्तान अशी घोषणा देणारा व्हिडिओ त्याने प्रसारित केला. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आपल्या हल्ल्याचा कट रचला होता. पण तो अपयशी ठरला. त्याला 13 डिसेंबर रोजी संसद भवनावर हल्ला करुन उत्तर देण्यात येईल अशी धमकी त्याने दिली होती.

आज काय घडले

आज नवीन संसदेत तरुणांनी धुडगूस घातला. तानाशाही नही चलेगी अशा घोषणा यातील दोन तरुणांनी दिल्या. संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्या. त्यांनी लोकसभा सभागृहात लक्ष वेधण्यासाठी स्मोक क्रॅकरचा वापर केला. त्यामुळे सभागृहात पिवळा धूर पसरला. त्यामुळे नाकाला झिणझिण्या आल्याचे खासदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कामकाज सुरु असतानाच या तरुणांनी संसदेच्या आत आणि बाहेर गोंधळ घातला. ही सुरक्षा व्यवस्थेतील घोडचूक असल्याचे समोर येत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.