Goa Elections 20022 : उत्पल पर्रिकरांच्या तिकीटावरून रणकंदन, परीकरांना कुणाची ऑफर? वाचा सविस्तर
मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर पणजीतून तिकीटासाठी आग्रही आहेत. मात्र कर्तुत्वावरुन सवाल करत गोव्याचे प्रभारी फडणवीसांनी तिकीट मिळणार नाही, असेच अप्रत्यक्ष संकेत दिले. त्यामुळं उत्पल पर्रिकरही बंडाच्या तयारीत आहेत.
फडणवीसांच्या याच 7 सेकंदाच्या प्रतिक्रियेनं, गोव्यात पर्रिकर कुटुंब विरुद्ध भाजप असा सामना सुरु झालाय.दिवगंत मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर पणजीतून तिकीटासाठी आग्रही आहेत. मात्र कर्तुत्वावरुन सवाल करत गोव्याचे प्रभारी फडणवीसांनी तिकीट मिळणार नाही, असेच अप्रत्यक्ष संकेत दिले. त्यामुळं उत्पल पर्रिकरही बंडाच्या तयारीत आहेत. उत्पल पर्रिकर गोव्याची दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे चिरंजीव आहेत. उत्पल पर्रिकरांची इंजिनिअरिंग फर्म आहे, जी मनोहर पर्रिकरांनीच स्थापन केली . मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर उत्पल पर्रिकरांना पणजीतून तिकीट मिळण्याची आशा होती, मात्र त्यावेळी भाजपच्या नेतृत्वानं पर्रिकरांचेच एकनिष्ठ सिद्धार्थ कुंकोळीकरांना तिकीट दिलं. काँग्रेसच्या बाबुश मॉन्सरेट यांनी कुंकोळीकरांचा पोटनिवडणुकीत पराभव केला, त्यानंतर बाबुश मॉन्सरेट भाजपमध्ये आले. त्यामुळं पुन्हा त्यांनाच तिकीट मिळेल अशी दाट शक्यता आहे.
शिवसेनेची उत्पल परीकरांना ऑफर
तर गुन्हेगारांना तिकीट देता मग मला का नाही ?, असा थेट सवाल उत्पल पर्रिकरांनी फडणवीसांनाच केला. शिवसेना उत्पल पर्रिकरांना निमंत्रण देतेय. तर अरविंद केजरीवालांनीही उत्पल पर्रिकरांना ऑफर दिलीय. संजय राऊत गोव्यात सध्या ठाण मांडून बसलेत. काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा प्रयत्न त्यांचा फसला. आता राष्ट्रवादीसोबत मिळून जवळपास 15 जागा शिवसेना लढण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे राऊत फडणवीसांना सतत टार्गेट करत असल्यानं गोव्यातही राऊत-फडणवीसांमध्ये सामना रंगलाय.
गोव्यात सत्ता राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.मात्र ज्या मनोहर पर्रिकरांचा दबदबा राहिलेल्या गोव्यात. त्यांच्याच मुलाशी खटके उडत असल्यानं भाजपला हे परवडणारं नाही. त्यामुळे वेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. आता उत्पल परीकर काय निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.