‘ठाकरे सरकारचा मोठा कोविड घोटाळा’, सोमय्यांचा पुन्हा आरोप, शिवसेनेचंही जोरदार प्रत्युत्तर
किरीट सोमय्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या दोघांनीही मुंबईतल्या कोव्हीड सेंटरची पाहणी केली. सोमय्या नेस्कोतल्या कोव्हिड सेंटरमध्ये गेले, तर महापौर पेडणेकरांनी बीकेसीतल्या कोव्हिड सेंटरची पाहणी केली.
मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेला इशारा दिलाय. 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोव्हिड घोटाळा बाहेर काढणार, असा दावा सोमय्या यांनी केलाय. विशेष म्हणजे किरीट सोमय्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), या दोघांनीही मुंबईतल्या कोव्हीड सेंटरची (Covid Center) पाहणी केली. सोमय्या नेस्कोतल्या कोव्हिड सेंटरमध्ये गेले, तर महापौर पेडणेकरांनी बीकेसीतल्या कोव्हिड सेंटरची पाहणी केली. मात्र आर्थिक कमाईसाठी लोकांना घाबरवून, कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.
आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरु आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केलाय. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. बीकेसीमध्ये 2 हजार 400 बेडपैकी 800 बेडवर रुग्ण आहेत. दहीसरमध्ये 750 बेड आहेत पण अजून एकही रुग्ण तिथे दाखल नाही. नेस्को सेंटरमध्ये 2 हजार बेड्सपैकी 900 बेड भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसंच ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील 99.99 टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावाही सोमय्यांनी केलाय.
Visited BMC COVID Centers today
At Dahisar out of 750 beds “Zero” Patient admitted till now
BKC & NESCO of 4400 Beds 1800 Occupied
Senior Citizens Comorbidity- Not Vaccinated requires long medical treatment
Senior Citizens, Not Vaccinated, Having Comorbidity be more Careful pic.twitter.com/lqZiJmKBCB
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 8, 2022
सोमय्यांच्या आरोपांना पेडणेकरांचं प्रत्युत्तर
किरीट सोमय्या यांच्या आरोपांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काविळ झाल्याप्रमाणं सोमय्यांना सगळं पिवळंच दिसत असल्याचा पलटवार पेडणेकर यांनी केलाय. “लोकांनी घाबरून जावे अशी वक्तव्ये आम्ही पहिल्यापासूनच केलेली नाहीत. कोरोना वाढत असला तरी लोकंनी घाबरुन जावू नये. घाबरण्यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करत काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचं संकट गंभीर आहे परंतु, आम्ही संकटांना घाबरत नाही. खुर्चीत बसून टीका करणं सोपं असतं. प्रत्यक्ष काम करून दाखवा”, असं आवाहन यावेळी महापौर पेडणेकर यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना केले.
वाढत्या ओमायक्राँन रुग्णांची संख्या लक्षात घेता वांद्रे-कुर्ला संकुलातील @mybmc @bkchospital केंद्राला महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भेट देऊन दाखल झालेल्या रुग्णांशी महापौरांनी संवाद साधून आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ.राजेश डेरे उपस्थित होते. pic.twitter.com/DiCSOBwqLx
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) January 8, 2022
फडणविसांकडून कोविड काळात घोटाळ्याचा आरोप
कोरोनाच्या काळात घोटाळा विशेषत: मुंबईत सत्ताधारी शिवसेनेनं घोटाळा केल्याचा आरोप, भाजपनं पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्यावेळीही केलाय..विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतही घोटाळ्याचा आरोप केला होता. “कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी केली असती तर राज्यातील 9 लाख 55 हजार रुग्ण कमी असते. तसेच करोनामुळे मरण पावलेल्या 30 हजार 900 करोना रुग्णांना महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं?”, असा प्रश्न फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला होता.
येत्या 3 महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शिवसेनेला घेरण्याची एकही संधी भाजप सोडताना दिसत नाही. अशावेळी 10 दिवसांत सोमय्या कोव्हिड सेंटरमधला नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर बातम्या :