‘बॅकरुम बॉय’ ते ‘मोदी मीन्स बिजनेस’ ते ‘राजकारणाचा जादूगार’, नरेंद्र मोदींचा भन्नाट प्रवास

PM Modi Birthday : गुजरातचा 14 वा मुख्यमंत्री देशाचा 14 वे पंतप्रधान बनणार होते. 14 चा आकडा मोदींसाठी इतका लकी ठरला की त्यांना मागं वळून पाहण्याची गरजच नाही उरली. कठीण परिस्थितीतही मोदींचं नेतृत्त्व तावून सुलाखुन निघालं.

'बॅकरुम बॉय' ते 'मोदी मीन्स बिजनेस' ते 'राजकारणाचा जादूगार', नरेंद्र मोदींचा भन्नाट प्रवास
लालकृष्ण आडवणींच्या रथरात्रेचं सगळं संचलन नरेंद्र मोदींनी केलं आणि पक्षाला आपलं काम दाखवलं
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 11:01 AM

अजय झा, नवी दिलली: 20 मे 2014, दिल्लीच्या कडाक्याच्या उन्हामध्ये संसद भवन परिसरात एक कार येऊ थांबली. तिथं मोठ्या संख्येने भाजपचे खासदार आणि नेते जमा झाले होते, ते एका व्यक्तीची वाट पाहात होते, त्या गाडीतून तो व्यक्ती बाहेर पडला. तो व्यक्ती दुसरा-तिसरा कुणी नव्हता तर ते होते नरेंद्र मोदी. ज्यांना लोक राजकारणाचा जादूगर म्हणत होते. 13 वर्षांपूर्वी या व्यक्तीला कुणीही ओळखत नव्हतं आणि आज तोच व्यक्ती राजकारणात सर्वोच्च स्थानी होता, हे पण कुठल्या जादूहुन कमी नव्हतं. मोदींना भाजपमध्ये बॅकरुम बॉय अशी ओळख होती. ज्यांनी कधीच निवडणूक लढवली नव्हती, ज्यांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा अनुभव नव्हता, त्या व्यक्तीकडे भाजपने गुजरात सरकार चालवण्याची जबाबदारी दिली. ती पण तेव्हा, जेव्हा गुजरात सरकारवर देशभरातून कडाडून टीका होत होती.  ( From ‘Backroom Boy’ to ‘Modi Means Business’ to ‘Magician of Politics’, Narendra Modi’s Abandoned Journey )

भुजचा भूकंप, ज्यात जवळपास 20,000 लोक मृत्यूमुखी पडले, यानंतर गुजरातच्या केशुभाई पटेल सरकारवरच्या कामावर लोक नाखुश होते. पुढची विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली होती. भाजपला आता कुणीतरी जादुगारच तारु शकेल असं म्हटलं जात होतं. अशा परिस्थिती तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी नरेंद्र मोदींना गांधीनगरची खुर्ची सांभाळण्याचा आदेश दिला. त्यावेळी मोदी भाजपच्या दिल्ली मुख्यालयाचे महासचिव होते. कुठल्या आधारावर वाजपेयी आणि आडवाणींनी मोदींना गुजरातमध्ये पाठवलं हे सांगणं अवघड आहे, मात्र त्यानंतर गुजरातच्या राजकारणात जादू झाली.

मोदींच्या नेतृत्त्व भाजप सलग तीनदा निवडणुका जिंकली होती आणि अखेर तो दिवस आलाच, जेव्हा हा जादुगार देशाच्या संसदेत प्रवेश करणार होता. खूप सारे खासदार आणि भाजपने नेते या पाया पडणार होते, पण या व्यक्तीने दाखल होताच पहिल्यांदा संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकवलं, जसं ती संसद नाही तर सोमनाथचं मंदिर आहे. त्यानंतर मोदींनी आपले गुरु आडवाणींचे पाय पकडले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. ज्या पण लोकांनी ही दृष्यं पाहिली, त्यांच्या मनावर ती आठवण कायमची कोरली गेली आहे. कारण, संसदेला फक्त लोकशाहीचं मंदिर म्हटलं जायचं, मात्र त्याची पुजा कधीही कुणी केली नाही. ही लोकशाहीची कमालच होती,की जो व्यक्ती लहानपणी चहा विकायचा, जो गरीबीत वाढला, ज्याच्या खानदानात आधी कुणीही राजकारण केलेलं नाही, ज्याला 13 वर्षांआधी खूप कमी लोक ओळखायचे तो व्यक्ती 6 दिवसांनंतर भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार होता.

चाईल्ड ऑफ डेस्टिनीवाले नरेंद्र मोदी

इंग्रजीत चमत्कारी व्यक्तीला लोक Child Of Destiny म्हणजे भाग्यशाली मुलगा म्हणतात. नरेंद्र मोदींना गुजरातचा काट्याचा मुकूट मिळाला होता. मात्र, तरी त्यांनी त्यांचं भविष्य घडवलं. भुजचा तो भूकंप आला नसता, केशुभाई पटेल सरकारने नाकर्तेपणा दाखवला नसला तर हे सांगणं खूप अवघड आहे की आज नरेंद्र मोदी कुठं असते. खुर्ची, पद तर खूप लोकांना मिळतं. मोदींआधी गुजरातमध्ये 13 मुख्यमंत्री झाले, मात्र कुणालाही मोदींइतकी लोकप्रियता मिळाली नाही. कार्यशैली, नशीब आणि योजनांच्या जोरावर मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मोदींनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. हा ही गोष्ट होती की, गुजरातचा 14 वा मुख्यमंत्री देशाचा 14 वे पंतप्रधान बनणार होते. 14 चा आकडा मोदींसाठी इतका लकी ठरला की त्यांना मागं वळून पाहण्याची गरजच नाही उरली. कठीण परिस्थितीतही मोदींचं नेतृत्त्व तावून सुलाखुन निघालं.

‘मोदी मीन्स बिजनेस’ची गोष्ट

2001 मध्ये जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले, तेव्हा परिस्थिती कठिण होती. डोक्यावर काट्यांच्या मुकूट होता, सरकारी अधिकाऱ्यांना हेच वाटायचं की एक व्यक्ती, ज्याने त्याच्या आयुष्यात निवडणूक लढवली नाही, प्रशासनाचा त्याला अनुभव नाही, त्याला आपल्या तालावर नाचवणं सोपं असेल. मात्र, याच्या अगदी उलटं झालं. मोदींनी प्रशासनाच्या क्षेत्रा अशी डुबकी मारिली की जसा मासा पाण्यात मारतो. त्यानंतर सगळीकडे चर्चा सुरु झाली की मोदी मीन्स बिजनेस. मोदींना प्रशासनाचं काम शिकायला वेळ नाही लागला. ते टफ टास्क मास्टरच्या रुपात प्रसिद्ध झाले. 16 तास रोजचं काम, मंत्री आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली आणि जे जबाबदारी पेलू शकत नव्हते, त्यांना घरी पाठवण्यात आलं.

गुजरात दंगलींनंतर निवडणूक जिंकली

मोदींनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारलाच होता, की त्यानंतर गोधरा हत्याकांडाची घटना घडली. त्यानंतर गुजरातमध्ये जे घडलं, ते भारताच्या इतिहासातील वाईट घटनांपैकी एक आहे. गुजरातमध्ये जातीय दंगली सुरु झाल्या. हिंसेची ती लाट आली जी कधी कुणी पाहिली नव्हती. दोन्ही मुख्य समुदायातील शेकडो लोक मारले गेले. गुजरातमध्ये आधीही जातीय दंगली झाल्या होत्या, ज्यात पोलीस एका गटाची बाजू घेतल असल्याचं बोललं जायचं. गोधरानंतरच्या दंगलीतही गुजरात पोलीस अपयशी ठरले, जोपर्यंत दंगलींवर ताबा मिळवला गेला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दंगलीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली.

मुख्यमंत्री असलेल्या मोदींवर पक्षपातीपणाचा आरोप झाला. जो कधीही सिद्ध झाला नाही. अमेरिकेने मोदींना आपल्या देशात येण्यास बंदी घातली. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीनी एका सार्वजनिक कार्यक्रमात मोदींना राजधर्माचं पालन करण्याचा सल्लाही दिला. असं म्हटलं जातं की, या दंगलींनंतर वाजपेयी मोदींना मुख्यमंत्रीपदावरुन हटवणार होते, मात्र आडवणी यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे मोदी मुख्यमंत्रीपदी कायम राहिले, वेळेत निवडणुका लागल्या आणि पुन्हा मोदी पर्यायाने भाजप गुजरातच्या गादीवर विराजमान झालं.

2014 च्या निवडणुकीत मोठा विजय

भाजप आडवाणींच्या नावावर निवडणूक लढवू इच्छित नव्हतं, त्यासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात होता. असा चेहरा जो काहीतरी जादू करेल. मोदीची इमेज तोपर्यंत विकास पुरुष अशी झाली होती. मात्र हिंदू पोस्ट बॉयचा टॅगही त्यांच्या पाठीमागे लागला होता. भाजपने 2013 मध्ये आडवाणींच्या विरोधाला झुगारत मोदींना पंतप्रधानपदाचा चेहरा बनवलं आणि त्यांनंतर सगळा देश मोदी लाटेत बुडाला. 30 वर्षांनंतर आणि 7 लोकसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष स्वबळावर सत्तेत आला. मोदींना भाजप आणि एनडीए या दोघांचा संसदिय दलाचा नेता निवडण्यात आलं. आणि त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मोदींना सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केलं.

जेव्हा मोदी संसदभवनात कारमधून उतरले, तेव्हा त्यांच्या कुठलाच घमंड वा अहंकार नव्हता. ते विचारात मग्न होते, त्यांना माहित होता आता आव्हानं अजून मोठी असणार आहेत. कारण आता फक्त गुजरात नाही तर संपूर्ण देशाबद्दल विचार करावा लागेल. त्यांना जनतेच्या आशा अपेक्षांवर स्वत:ला सिद्ध करायचं होतं. अजून एक योगायोग असा की, मुख्यमंत्री बनण्याआधी मोदी कधीच गुजरात विधानसभेत गेले नाहीत, आणि पंतप्रधान बनण्याआधीही मोदींनी संसद पाहिली नव्हती. विनम्रतेने मोदींनी आपलं डोकं संसदेच्या पायऱ्यांवर ठेवलं आणि भारतात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.