Gyanvapi : ‘ज्ञानवापी’चं मराठा कनेक्शन, मल्हारराव होळकर मशिद पाडण्यासाठी वाराणसीत पोहोचले, पण काशीच्या पुरोहितांनी कच खाल्ली!

मुगलांना वचक बसावा आणि वास्तूंशी जी छेडछाड झालीय, ती मुळ रुपात यावी म्हणून मराठा मल्हारराव होळकर फौजेनेशी काशीत पोहोचले. पण तेव्हा एक गोष्ट घडली, आणि मल्हारराव होळकरांना मागे फिरावं लागलं!

Gyanvapi : 'ज्ञानवापी'चं मराठा कनेक्शन, मल्हारराव होळकर मशिद पाडण्यासाठी वाराणसीत पोहोचले, पण काशीच्या पुरोहितांनी कच खाल्ली!
ज्ञानवापी आणि मराठा कनेक्शनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 10:40 PM

मुंबई : ज्ञानवापी मशिदीवरुन (Gyanvapi Mosque) सध्या मोठा वाद पाहायला मिळतोय. याच वादावरुन कधीकाळी मराठा सैन्य 20 हजारांची फौज घेऊन काशीत धडकलं होतं. मल्हारराव होळकर (Malharrao Holkar) हे या तुकडीचं नेतृत्व करत होते. औरंगजेबाच्या आदेशानं मंदिर पाडून मशीद उभी राहिल्याची बातमी मराठा सैन्याला लागली होती. मुगलांना वचक बसावा आणि वास्तूंशी जी छेडछाड झालीय, ती मुळ रुपात यावी म्हणून मराठा मल्हारराव होळकर फौजेनेशी काशीत (Varanasi) पोहोचले. पण तेव्हा एक गोष्ट घडली, आणि मल्हारराव होळकरांना मागे फिरावं लागलं! जर 300 वर्षांपूर्वी काशीतल्या पुरोहितांनी मराठ्यांना रोखलं नसतं, तर आज ज्ञानवापी मशिदीचा तंटा उभा राहिलाच नसता.

27 जून 1742 रोजी मराठा सरदार मल्हारराव होळकर 20 हजारांची फौज घेऊन काशीत पोहोचले. औरंगजेबाच्या सैन्यानं केलेल्या कृत्याच्या परतफेडीची खूणगाठ मल्हारराव होळकरांनी बांधली होती. जिथं मंदिर पाडून मशीद उभी केली गेली, ती मशीद पाडण्याचा पुढाकार मल्हारराव होळकरांनी घेतला होता. मंदिरं पाडण्याची मालिका थांबावी आणि मुघलांनाही जशास तसं उत्तर मिळावं, हा त्यामागचा हेतू होता. होळकरांमुळे प्राचीन ठेव्याशी झालेल्या छेडछाडीची दुरुस्ती आणि मुघलांवर वचक या दोन्ही गोष्टी साध्य होणार होत्या. मात्र, त्यावेळी काशीतल्या काही पुरोहितांनी कच खाल्ली आणि त्यामुळे मल्हारराव होळकरांचा नाईलाज झाला.

पुरोहितांनी कच खाण्यामागे नेमकं कारण काय?

पुरोहितांनी कच खाण्यामागचं कारण होतं ते पुन्हा मुघलांच्या आक्रमणाची भीती.कारण, दिल्लीत आणि दख्खन म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्र, कर्नाटकाच्या भागात मराठ्यांनी मुघली फौजांना सळो की पळो करुन सोडलं होतं, पण त्याकाळात उत्तर भारतात मुघली आक्रमणाची भीती कायम होती. मराठे इथं मंदिर उभं करुन दिल्लीला परततील, मात्र त्यानंतर पुन्हा मुघली सैन्य काशीवर आक्रमण करेल, ही भीती काही पुरोहितांनी सतावत होती. या भीतीमुळे मल्हारराव होळकरांना पुरोहितांनी मशीद पाडण्यापासून रोखलं. त्यामुळे मल्हारराव होळकर आपल्या 20 हजार मराठा फौजेसह माघारी फिरले आणि काशीतल्या मशिदीची ही वादग्रस्त रचना आजतागायत तशीच राहिली.

हे सुद्धा वाचा

सोमनाथ मंदिराबाबत काय हडलं होतं?

यानंतर साल उजाडलं ते 1782 चं. मराठा सरदार महादजी शिंदेंनी लाहोरवर हल्ला चढवला. काही नोंदीप्रमाणे या हल्ल्याआधी मोहम्मद गझनीनं सोमनाथच्या मंदिरावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सोमनाथ मंदिराचे चांदीचे दरवाजे काढून गझनीनं ते लाहौरच्या एका मशिदीला लावले होते. त्याचीही परतफेड महादजी शिंदेंनी लाहौरच्या हल्ल्यात केली. लाहौरच्या मशिदीवरचे सोमनाथाचे चांदीचे दरवाजे महादजी शिंदेंनी परत आणले. पण सोमनाथच्या पुजाऱ्यांनी ते बसवू दिले नाहीत. मशिदीवर बसवलेली दारं पुन्हा नकोत, म्हणून त्याला नकार दिल्याचं बोललं जातं. त्यानंतर तीच दारं उज्जैनच्या गोपाल मंदिरात लावली गेली. असं म्हणतात की, ते चांदीचे दरवाजे आजही तिथं आहेत.

काशी विश्वनाथाच्या आवारात अहिल्याबाई होळकरांचीही मूर्ती

इतिहास कशी पुनरावृत्ती करतो ते बघा, जिथं मंदिर पाडून मशीद उभी राहिली होती, त्याविरोधात मल्हारराव होळकर 1742 मध्ये काशीला गेले होते. ते काम काही वर्षांनी मल्हाररावांची सून म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी पूर्णत्वाला आणलं. आत्ताचं जे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे, त्याचा जीर्णोद्दार अहिल्याबाई होळकरांनी केला आहे. पण ते करताना त्यांनी मशिदीच्या वादग्रस्त जागेऐवजी त्याच्या बाजूला विश्वनाथाचा जीर्णोद्धार केला. आज काशीत जे विश्वनाथाचं मंदिर आहे, ते हेच अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे. पुढे शिखांचे राजे रणजीत सिंहांनी काशी विश्वनाथाच्या कळसावर सोन्याचा पत्रा चढवला. म्हणून काशी विश्वनाथाच्या आवारात अहिल्याबाई होळकरांचीही एक मूर्ती बसवली गेली आहे.

कोणताही सम्राट किंवा धर्मपंडितांनी केले नसतील, इतक्या शिवमंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केलाय. सोमनाथापासून ते काशी विश्वनाथापर्यंत हिंदुच्या आस्थेची स्थळं अहिल्याबाईंच्या पुढाकारानं पुन्हा उभी राहिली. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे अहिल्याबाईंनी कधीच त्याचा गाजावाचा केला नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.