Mahatma Gandhi : भारतीय स्वातंत्र्याच्या उत्सवात महात्मा गांधी उपस्थित का नव्हते?

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य देण्याची घोषणा ब्रिटिशांनी केली. मात्र, स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी या लढ्यातील प्रमुख नेते महात्मा गांधी दिल्लीतील स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी नव्हते. ते बंगालमधील जळालेल्या एका घरात होते.

Mahatma Gandhi : भारतीय स्वातंत्र्याच्या उत्सवात महात्मा गांधी उपस्थित का नव्हते?
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 2:57 PM

मुंबई : ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या जोखडातून भारत स्वातंत्र झाला. यात अनेक महापुरुषांचं मोलाचं योगदान आहे. मात्र, त्यात महात्मा गांधींचं वेगळं स्थान आहे. गांधींनी नैतिकतेचा ढोल वाजवणाऱ्या ब्रिटिशांना आपल्या अनोख्या सविनय कायदेभंग आणि उपोषणाच्या अहिंसावादी मार्गाने जेरीस आणलं. यातून त्यांनी ब्रिटिशांची शोषणकारी आणि दडपशाही करणारी तथाकथित नैतिकता जगासमोर आणली.

हिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मागणाऱ्या अनेक क्रांतीकारकांना ब्रिटिशांना दडपणे सोपं गेलं, पण गांधींच्या या आंदोलनांचा सामना करताना ब्रिटिशांच्या नाकी नऊ आले. अखेर अनेक घटकांचा परिणाम म्हणून भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य देण्याची घोषणा ब्रिटिशांनी केली. मात्र, स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी या लढ्यातील प्रमुख नेते महात्मा गांधी दिल्लीतील स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी नव्हते. ते बंगालमधील जळालेल्या एका घरात होते.

भारताला स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याआधी फाळणीची मोठी जखम

महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी नव्हते मग ते नेमके कुठं होते आणि ते या उत्सवात सहभागी का झाले नाही? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. यामागील कारणंही तसंच आहे. भारताला स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याआधी फाळणीची मोठी जखम झाली. भारतातील हिंदू आणि मुस्लीम कट्टरतावादी संघटनांच्या द्वेषाच्या राजकारणाने स्वातंत्र्याआधीच भारताची फाळणी झाली आणि नाईलाजाने तत्कालीन नेतृत्वाला ती स्वीकारावीही लागली. मात्र, यानंतर पंजाब आणि बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली उसळल्या.

दंगलींमध्ये होरपळणाऱ्या नागरिकांच्या रक्षणासाठी महात्मा गांधींचा पुढाकार

या दंगली इतक्या भयानक होत्या की या भागातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाची आठवणही राहिली नाही. ते केवळ दंगलीच्या जखमांनी व्हिवळत होते. अशावेळी या दंगली थांबवून नागरिकांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी महात्मा गांधींनी पुढाकार घेतला आणि ते थेट बंगालमध्ये गेले.

“माझा देश जळत असताना मी कोणत्याही उत्सवात सहभागी होऊ शकत नाही”

महात्मा गांधी यांनी बंगालमध्ये आपल्या अनुयायांसोबत पायी फिरुन लोकांना विश्वास दिला आणि दंगल करणाऱ्या गटांना आपले शस्त्रं खाली टाकण्याचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला गांधींनी दिल्लीतील उत्सवात सहभागी व्हावं म्हणून स्वतः पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आग्रही होते. यासाठी त्यांनी गांधींना तार पाठवून निमंत्रणही दिलं. मात्र, गांधींनी हे निमंत्रण नाकारत माझा देश जळत असताना मी कोणत्याही उत्सवात सहभागी होऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं. यानंतर गांधींनी बंगाल पिंजून काढला आणि या धार्मिक दंगली नियंत्रणात आणल्या.

महात्मा गांधींच्या त्या काळच्या त्यांच्या प्रार्थना सभा आणि इतर लेखनाचा अभ्यास केला असता स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर देशात तयार झालेल्या परिस्थितीने महात्मा गांधी कमालीच दुःखी झाल्याचंही समोर आलंय.

“धार्मिक सौहार्दासाठी झटणाऱ्या गांधींची धार्मिक कट्टरतावाद्याकडूनच हत्या”

चौरीचौरा येथे आंदोलकांनी एक पोलीस चौकी जाळली म्हणून संपूर्ण देशभर सुरू असलेलं राष्ट्रीय आंदोलन थांबवणाऱ्या गांधींना फाळणी आणि त्यानंतरचा धार्मिक हिंसाचार अगदीच आवडला नव्हता. त्यामुळेच नंतरच्या काळातही महात्मा गांधी यांनी देशात सौहार्दपूर्ण धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या याच प्रयत्नामुळे पुढे त्यांचा धर्मांधांनी खून केला. यावेळी देखील धार्मिक दंगली व्हाव्यात म्हणून हत्यारा नथुराम गोडसे याने आपण मुस्लीम असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गांधींच्या सतर्क अनुयायांनी हा डाव ओळखून तो उधळला.

हेही वाचा :

‘भारत छोडो आंदोलना’ची ठिणगी पडली आणि इंग्रजांना पळता भुई थोडी झाली

Photos : मानवी इतिहासाची दिशा बदलणारे जगातील 10 आंदोलनं कोणती? वाचा सविस्तर…

गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण अंगिकारलं, तर अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील : राज ठाकरे

व्हिडीओ पाहा :

Know why Mahatma Gandhi was not present in Delhi for celebration of Indian Independence

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.