AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेत ज्वालामुखी धूमसतोय? अनिल परबांचं प्रकरण, रामदास कदमांचा दावा आणि गीतेंचा खंजीर, नेमकं काय घडतंय?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यापासून शिवसेनेच्या मागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. शिवसेनेचे मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक यांच्यापासून ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवरही घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. (shivsena)

शिवसेनेत ज्वालामुखी धूमसतोय? अनिल परबांचं प्रकरण, रामदास कदमांचा दावा आणि गीतेंचा खंजीर, नेमकं काय घडतंय?
political leader
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 1:37 PM

मुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यापासून शिवसेनेच्या मागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. शिवसेनेचे मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक यांच्यापासून ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवरही घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. त्यातच शिवसेनेचे नेते रामदास कदम हेच सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा मनसे नेत्याने केला आहे. तर शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादीलाच घेरलं आहे. त्यामुळे शिवसेनेत ज्वालामुखी धुमसतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. (several senior sena leaders upset in shiv sena?, read what’s going in sena?)

शिवसेनेत धुसफूस?

राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेनेने अनेक नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलले. तर भाजपशी युती तोडल्याने केंद्रातही संधी मिळत नसल्यामुळे शिवसेना नेते नाराज आहेत. त्यातूनअच त्यांच्या मनातील खदखद बाहेर येत असल्याचं सांगितलं जात आहे. अनिल परब यांचा रिसॉर्ट आणि त्यावरून रामदास कदम यांच्यावर मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलेला आरोप हा त्याचाच एक भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, भाजप सोबत शिवसेनेची युती न झाल्याने आपलं पुनर्वसन होऊ शकलं नसल्याचं शल्य अनंत गीते यांना बोचत असावं. त्यामुळेच त्यांनी काहीही वादविवाद नसताना थेट शरद पवारांवर हल्ला केला. त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. यावरून शिवसेनेत धुसफूस असल्याचं दिसतं, असं राजकीय सूत्रांनी सांगितलं.

गीते नेमकं काय म्हणाले?

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.

रामदास कदमांचा दावा काय?

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळा शिवसेना नेते रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खेडेकर यांच्या या आरोपांवर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. खेडेकर यांचे आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं सांगतानाच गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाडच पाहिलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे. वैभव खेडेकर यांची पुष्कळशी प्रकरणं मी माहितीच्या अधिकारातून काढली. आमच्या नऊ नगरसेवकांनी त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. त्यामुळे ते प्रचंड बिथरले. म्हणूनच त्यांनी माझ्यावर निखालस खोटे, चुकीचे आणि दिशाभूल करणारे आरोप केले, असा दावा कदम यांनी केला आहे.

अनिल परब यांचा जो रिसॉर्ट आहे. त्याची तक्रार किरीट सोमय्यांकडे मी केली, असं खेडेकर यांचं म्हणणं आहे. खेडेकरांचं हे म्हणणं हस्यास्पद आहे. गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाड पाहिलं नाही. भेटणं तर लांबच झालं. सोमय्यांना टीव्हीवर कधी तरी पाहतो. मी समोरून अंगावर जाणारा माणूस आहे. मी कधी कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही हे सर्व महाराष्ट्र जाणून आहे. मी अनिल परबच्या हॉटेलची तक्रार का करणार? तसं केल्यानं काय साध्य होणार आहे? अनिल परब हे माझ्या पक्षाचे मंत्री आहेत. याचं मला भान आहे. मी कडवा शिवसैनिक आहे, असं त्यांनी सांगितलं.

माझ्याच पायावर धोंडा कशाला पाडू?

रामदास कदम सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा बिनबुडाचा आरोपही खेडेकर यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्र रामदास कदमला ओळखतो. रामदास कदम हा कडवा सैनिक आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. एक गोष्ट पुन्हा सांगतो. विधानसभेच्या निवडणुकीत मीच पत्रकार परिषद घेऊन यापुढे कोणतंही पद घेणार नाही, अशी घोषणा केली होती. तेव्हा मंत्रीपद मिळण्याचा प्रश्नच येत नाही. नाराज असण्याचाही प्रश्नच नाही. मीच कोणतंही पद घेणार नसल्याचं सर्वात आधी सांगितलं होतं. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येतो कुठे? तसं असतं तर मी इथे आलोच नसतो, असं सांगतानाच सरकार पाडणं म्हणजे मी माझ्या पायावर धोंडा मारून घेणं एवढं मला कळतं ना. सरकार पडलं तर नुकसान माझं होईल. मी कशाला सरकार पाडू. पण ज्याला अक्कल नाही. ज्यांची अकलेची गाठ नाही. आपण कुणावर बोलतो, काय बोलतो यांचं ज्यांना भान नाही, असे लोक बिनबुडाचा आरोप करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

रिसॉर्ट आणि सोमय्यांचा दावा

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिंडळातील मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट अॅनेक्स असं आहे. तर दुसऱ्याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट असं असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचं लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचं केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन्ही रिसोर्टमध्ये सीआरझेडचा भंग झाला आहे. पण सरकारने केवळ साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, असा दावा किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. (several senior sena leaders upset in shiv sena?, read what’s going in sena?)

संबंधित बातम्या:

अतिनैराश्यातून अनंत गीते बेभान, शरद पवारांवरील टीकेनंतर सुनील तटकरे आक्रमक

VIDEO: अनिल परबांच्याविरोधात रामदास कदमांनीच सोमय्यांना दारुगोळा पुरवला? कदमांची पहिली प्रतिक्रिया

अनंत गीते म्हणाले, ‘शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत’, आता संजय राऊत म्हणतात, ‘पवारसाहेब देशाचे नेते!’

(several senior sena leaders upset in shiv sena?, read what’s going in sena?)

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.