ज्या डिसेंबरमध्ये सर्व काही मिळालं, त्याच डिसेंबरमध्ये शेवट, जनरल रावत यांचं डिसेंबरशी नातं काय?

जनरल बिपीन रावत यांच्या आयुष्यावर जरी एक नजर टाकली तर डिसेंबरचा योगायोग ठळकपणे दिसून येतो. जनरल रावत यांच्या लष्करातल्या पदार्पणापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत सर्व प्रमुख घटना ह्या थंडीनं गोठवून टाकणाऱ्या डिसेंबर महिन्यातच घडल्याचं दिसून येतं.

ज्या डिसेंबरमध्ये सर्व काही मिळालं, त्याच डिसेंबरमध्ये शेवट, जनरल रावत यांचं डिसेंबरशी नातं काय?
जनरल बिपीन रावत यांच्या आयुष्यातल्या सर्व महत्वाच्या घडामोडी डिसेंबर महिन्यात घडलेल्या दिसतात
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 9:24 AM

आपल्याकडे योगा योग, नियती ह्या गोष्टींवर बरीच चर्चा होते. अनेक वेळेस त्यात अंधश्रद्धाही असल्याची चर्चा झडते. पण काही योगायोगांकडे दुर्लक्ष करता येत नाही. माणसाच्या नियतीतच असं काही लिहिलं असेल का हा सवाल अनेकांच्या आयुष्यातल्या घडामोडींकडे पाहिलं की वाटतं. जनरल बिपीन रावत यांच्या आयुष्यावर जरी एक नजर टाकली तर डिसेंबरचा योगायोग ठळकपणे दिसून येतो. जनरल रावत यांच्या लष्करातल्या पदार्पणापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत सर्व प्रमुख घटना ह्या थंडीनं गोठवून टाकणाऱ्या डिसेंबर महिन्यातच घडल्याचं दिसून येतं.

डिसेंबरमध्ये काय काय घडलं? बिपीन रावत हे पहिल्यांदा लष्करी अधिकारी झाले तेही डिसेंबर महिन्यातच. तारीख होती 16 डिसेंबर 1978. गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये त्यांना ऑफिसर बनवण्यात आलं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1980 साली रावत यांचं प्रमोशन झालं. ते लेफ्टनंट झाले, ती तारीख होती 16 डिसेंबर 1980. त्यानंतर 9 वर्षांनी त्यांचं पुन्हा प्रमोशन झालं. ते होतं मेजर होण्याचं. ते मेजर झाले ते 16 डिसेंबर 1989 रोजी. रावत यांनी जे मर्दूमकी गाजवली त्यासाठी लष्कराच्या आर्मी कमांडर ग्रेडमध्ये त्यांना पुन्हा प्रमोशन मिळालं. तेही 2015 च्या डिसेंबरमध्येच.

आणि रावत लष्करप्रमुख झाले देशाच्या सर्वोच्च लष्करी पदावर म्हणजे लष्करप्रमुखपदी रावत यांची नियुक्ती झाली तीही डिसेंबरमध्येच. तारीख होती 17 डिसेंबर 2016. त्यानंतर देशात पहिल्यांदाच सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफचं पद निर्माण करण्यात आलं. योगायोग असा की, हे पदच रावत यांच्यासाठीच निर्माण केलं गेलं असावं. लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर जनरल रावत हे पहिले सीडीएस झाले तेही डिसेंबर महिन्यातच. 30 डिसेंबरला जनरल रावत हे निवृत्त झाले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी सीडीएस म्हणून काम सुरु केलं. म्हणजेच तारीख होती 31 डिसेंबर.

शेवटचा श्वासही डिसेंबरमध्येच जनरल बिपीन रावत यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घडामोडी ह्या डिसेंबर महिन्यात घडल्या आणि आयुष्याचा शेवटही डिसेंबरमध्येच झाला. काल म्हणजेच 8 डिसेंबर रोजी जनरल रावत हे तामिळनाडूत लष्कराच्याच कार्यक्रमासाठी दौऱ्यावर होते. त्यावेळेस कुन्नूरच्या जंगलात त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि यातच त्यांचा पत्नीसह मृत्यू झाला. इतर 11 जणांनाही जीव गमवावा लागला. ज्या डिसेंबरनं सर्व काही दिलं, त्याच डिसेंबरनं जीवही हिरावून घेतला.

हे सुद्धा वाचा: Nagpur Murder | रिलेशनशीपनंतर लग्नाला नकार, प्रियकराने मॉलमध्ये भेटायला बोलवून प्रेयसीचा गळा आवळला

Travel Special : जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर ‘या’ अनोख्या राईड्सला नक्की भेट द्या!

Nashik Wedding Theft | लग्नाला आला, जेवणावर ताव मारला आणि नववधूचे सहा लाखांचे दागिने उचलून पळाला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.