Explained | भाजपाला तिकीटं कापल्याचा फटका महाराष्ट्रात बसला होता, यूपीमध्ये काय होणार?

UP Assembly Elections 2022 : विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात दिग्गज नेत्यांची तिकीटं कापली. त्याचा फटकाही भाजपला बसला. आता उत्तर प्रदेशातही तब्बल 20 आमदारांची तिकीट पहिल्याच यादीत योगी आदित्यनाथांनी कापली.

Explained | भाजपाला तिकीटं कापल्याचा फटका महाराष्ट्रात बसला होता, यूपीमध्ये काय होणार?
उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 9:34 PM

विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात दिग्गज नेत्यांची तिकीटं कापली. त्याचा फटकाही भाजपला बसला. आता उत्तर प्रदेशातही तब्बल 20 आमदारांची तिकीट पहिल्याच यादीत योगी आदित्यनाथांनी कापली. त्यामुळं आधीच गळती लागलेल्या भाजपला, नवे उमेदवार तारणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. उत्तर प्रदेशात भाजपनं 20 आमदारांचं तिकीटं कापलंय. महाराष्ट्रात तिकीट कापल्याचा फटका भाजपला बसला होता. त्यात आता यूपीत काय होणार? याकडे सगळ्यांची बारीक नजर लागली आहे. अशातच अखिलेश यादव यांनी भाजपनं योगींना आधीच घरी पाठवलंय, असं वक्तव्य केलंय. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पहिली यादी जाहीर केली. यात 2 आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. पहिली बाब म्हणजे भाजपनं पहिल्याच 107 उमेदवारांच्या यादीत 20 आमदारांची तिकीटं कापली. तर योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार असं बोललं जात होतं. मात्र भाजपनं त्यांना सुरक्षित सीट समजल्या जाणाऱ्या गोरखपूरमधूनच उमेदवारी दिलीय. त्यामुळं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादवांनी योगींना चिमटा काढत, भाजपनं आधीच योगींना घरी पाठवल्याचं म्हटलंय…

दुसरीकडे स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि धर्म सिंह सैनी या 3 मंत्र्यांसह आतापर्यंत 14 मंत्र्यांनी भाजपमधून राजीनामा दिलाय. यापैकी 8 जणांनी समाजवादी पार्टीत प्रवेशही केला…त्यातच आता पहिल्याच यादीत भाजपनं 20 आमदारांचं तिकीट कापलं…त्यामुळं हे 20 आमदार समाजवादी पार्टीत जाणार अशी चर्चा सुरु झालीय…मात्र भाजपच्या मंत्री आणि आमदारांना पक्षात घेणार नाही, असं अखिलेश यादवांनीही स्पष्ट केलंय. आता अखिलेश यांनी खरंच असं काही ठरवलं की भाजपला गुगली आहे हे लवकरच दिसेल…पण ज्या पद्धतीनं भाजपनं आमदारांचं तिकीट कापलंय, ते भाजपसाठी नुकसान की फायदा ? हाही विषय आहेच…कारण महाराष्ट्रातही दिग्गज नेत्यांना आमदारकीचं तिकीट कापल्यानं भाजपला फटका बसला होता.

राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी याबाबत बोलताना म्हटलंय की उत्तर प्रदेशातील आमदार जिद्दीवर उतरले आहेत. तब्बल दीडशे आमदारांनी योगींच्या विरोधात धरणं आंदोलन केलं होतं. त्याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होणारच नाही, असंही म्हणणं घाईचं ठरेल. उत्तर प्रदेशात जातीय समीकरण फारच महत्वाचा फॅक्टर आहे. त्यातच स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि धर्म सिंह सैनी या 3 मंत्र्यांनी भाजप सोडलीय..ते 20 % मतांनी भाजपची डोकेदुखी वाढवू शकतात.

यादव समाजाचे 9 %, कुर्मी समाजाचे 5 % मतं आणि मौर्य-कुशवाह समाजाचे 6 % मतं, अशी एकूण 20 % मतं आहेत, ज्यावर स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि धर्म सिंह सैनी यांचा प्रभाव आहे. दुसरीकडे योगी आदित्यनाथांनी तर 80 % विरुद्ध 20 % अशी लढाई असल्याचं सांगून…मुस्लीम व्होट बँकेवरुन राजकारण करणाऱ्या समाजवादी पार्टीला डिवचलं होतं. एखादा नेता किंवा उमेदवारासाठी सध्या तिकीट मिळवणं किती जिकीरीचं झालंय, हे या व्हिडीओवरुन सहज लक्षात येईल…67 लाख देऊनही तिकीट न मिळाल्याचा आरोप करुन बीएसपीचे नेते अरशद राणांना अक्षरश: रडू कोसळलं. त्यामुळं आता भाजपनं ज्या 20 आमदारांची तिकीटं कापली, ते नेमकं काय करणार…भाजपचाच खेळ बिघडवणार का ? की भाजपसोबतच राहणार, हे पुढच्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या :

UP ELECTION 2022 : उत्तर प्रदेशाच्या रणसंग्रामासाठी भाजप तयार, 44 ओबीसी, 19 एससी उमेदवारांना तिकीट; सोशल इंजीनियरिंगवर भर

UP Assembly Election 2022: योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार नाही, सेफ मतदारसंघातून लढणार; उपमुख्यमंत्री मोर्य सिराथूमधून मैदानात

Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.