ट्रेंडी-फॅशनेबल आणि तिच्या डान्स मूव्हसाठी प्रसिद्ध असलेली बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपला जलवा दाखवला आहे. डीपनेक बॉडी हगिंग गाउनमधील आकर्षक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री मलायका अरोरा 48 वर्षांची झाली आहे, पण तिचा फिटनेस पाहून कोणाचा यावर विश्वास बसणार नाही. वयाच्या या टप्प्यावरही ती खूप सुंदर दिसते. ती तिच्या चाहत्यांना इंम्प्रेस करण्यात कमी पडत नाही.
मलायका अरोराने बॅकलेस गाऊन परिधान केला आहे. या ड्रेससोबत तिने नेकलेस, ब्रेसलेट आणि अंगठीही घातली आहे.मलायका अरोराच्या सॅटिन स्लिप ड्रेसची किंमत सुमारे 16,804 रुपये आहे.
या ऑऊटफिटवर मलायकाने आपले केस मोकळे सोडले आहेत. याबरोबरच परफेक्ट मेकअपने तिचा लूक पूर्ण केला. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स व कमेंटचा पाऊस पडला आहेत.
मलायका अरोराने या फोटोवर अनेकांनी 'गॉर्जियस' 'स्टनिंग' 'सेक्सी' अश्या कमेंट केल्या आहेत. तर बेस्टी करीना कपूरने 'आप किसे देख रही हैं.' अशी कमेंट केली आहे.