PHOTO : अभिनेत्री नेहा पेंडसे विवाहबंधनात
लग्नात नेहाने फिका गुलाबी रंगाची नववारी साडी नेसली होती.

नेहाचा ब्रायडल लूक सध्या खूप व्हायरल होतो आहे.
- टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे विवाह बंधनात अडकली आहे. प्रियकर शार्दुल सिंग बयाससोबत तिने 5 जानेवारीला लग्न केलं. त्यांचं लग्न मराठी परंपरेनुसार झालं.
- यावेळी नेहा मराठमोळ्या नवरी म्हणून शोभत होती. ती अत्यंत सुंदर दिसत होती. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सध्या समोर आले आहेत.
- लग्नात नेहाने फिक्या गुलाबी रंगाची नववारी साडी नेसली होती. त्यासोबत तिथे नथ, कपाळावर चंद्रकोर, हिरवा चुडा आणि केसांमध्ये गजरा घातला होता.
- शार्दुलने फिक्या गुलाबी-पांढरा कॉम्बिनेशनचा कुर्ता घातला होता.
- नेहाचा ब्रायडल लूक सध्या खूप व्हायरल होतो आहे.
- लग्नापूर्वी नेहा आणि शार्दुलचा साखरपुडा पार पडला. यावेळी तिने हिरव्या रंगाचा सुंदर गाऊन घातला होता.
- नेहाच्या संगीतचेही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये तिने फंकी अशी मल्टीकलरची लेहंगा-चोली घातली आहे.
- नेहा आणि शार्दुलचं लग्न पुण्यात पार पडलं. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते.









