अभिनेत्री नेहा शर्माचा आज 33वा वाढदिवस आहे. तिचा जन्म 21 नोव्हेंबर 1987 ला बिहारच्या भागलपूर येथे झाला.
नेहानं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे. मात्र यात तिला काही खास यश मिळालं नाही.
विशेष म्हणजे नेहाचा राजकीय क्षेत्राशीही खास संबंध आहे. ती भागलपूरचे काँग्रेस नेते अजित शर्मा यांची मुलगी आहे.
अजित शर्मा हे राजकारणात पाऊल टाकण्यापूर्वी एक व्यावसायिक होते.
अजित शर्मा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उभे असताना नेहानं वडिलांसाठी भरपूर प्रचार केला होता. तिला बघण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.
नेहाने दाक्षिणात्य चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. 'चिरुथा' हा तिचा पहिला चित्रपट. त्यानंतर तिने ‘क्रूक’,‘तेरी मेरी कहानी’, ‘क्या सुपर कूल हैं हम’, ‘यमला पगला दीवाना’, ‘यंगिस्तान’, ‘कीर्ति’, ‘तुम बिन 2’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.